गोंडेगाव कोळसा खदान चा , ट्रक मध्ये १० टन कोळसा चोरून नेताना पकडले.

गोंडेगाव कोळसा खदान चा, ट्रक मध्ये १० टन कोळसा चोरून नेताना पकडले.

#) सुरक्षा अधिकारी च्या तक्रारीने पोस्ट कन्हान ला २ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून १६ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस १० कि मी अंतरावर गोंडेगाव खोल खुली खदान येथील कोळसा चोरी करून ट्रक मध्ये भरून नेताना प्रभारी सुरक्षा अधिकारी हयानी पेट्रोलिंग दरम्यान भाटिया बंद कोल वासरी जवळ ट्रक मध्ये चोरीच्या १० टन कोळसा भरून चोरून नेताना ट्रक चालका सह ट्रक पकडुन कन्हान पोलीस स्टेशन ला वेकोलि सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारीने कन्हान पोलीसानी ट्रक व १० टन कोळसा असा एकुण १६ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार रविवार (दि.२२) ला रात्री १२ वाजता वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी नागनाथ चरणदास खोब्रागडे वय ४५ वर्ष रा. गोडे गाव कॉलोनी हे गोडेगाव खुली खदान परिसरात पेट्रोलिंग गाडी सोबत सुरक्षा रक्षक शिवमुरत कुरील, आशिष घोपटे, अधिकरण बेहुने सह पेट्रोलिंग करीत असताना मध्यरात्री ३ वाजता गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली कि, गोडेगाव वस्तीच्या मागुन ट्रक क्र एम एच ४० बीजी ५३४३ मध्ये चोरीचा कोळसा भरून निघत असता ट्रक थांबुन चोकशी केल्याने आरोपीने ट्रक चालक दिपक रमेश भुनेश्वर वय ३१ वर्ष रा. विना संगम खापरखेडा यास
भाटिया बंद कोल वासरी समोर रात्री ३.१५ वाजता दरम्यान पकडुन त्यास ताब्यात घेत पाहणी केली असता अंदाजे १० टन कोळसा किमत १ लाख रु चा माल ट्रक मध्ये दिसला. सदर चोरीचा कोळसा हा उमेश पानतावने राह. कांद्री-कन्हान याचा असल्याचा सांगितल्याने कोळसा बाबत कागदपत्र विचारले असता कोळसाचे कागद पत्र नसल्याचे सांगितल्याने ट्रक चालका व कोळसासह ट्रक ताब्यात घेऊन कन्हान पोलीस स्टेशन ला जाऊन वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी नागनाथ खोब्रागडे हयानी वेकोलि चा कोळसा चोरीची केल्याची तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी ट्रक क्र एम एच ४० – जीबी ५३४३ किमत १५,००,००० रूपये व कोळसा १० टन किमत १,००,००० रूपये असा एकुण १६ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी ट्रक चालक १) दिपक रमेश भुनेश्वर वय ३१ वर्ष रा. विना संगम खापरखेडा, २) उमेश पानतावने राह. कांद्री-कन्हान या दोघा विरूध्द अप क्र ३०७ /२२ कलम ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे नापोशी रामेलवार पुढील तपास करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

स्ट्रीट लाईटच्या खांबाला करंट, मुलगी थोडक्यात वाचली तर दोन डुक्कराचा करंट लागुन मृत्यु : जवादार कोण ?

Mon May 23 , 2022
स्ट्रीट लाईटच्या खांबाला करंट, मुलगी थोडक्यात वाचली तर दोन डुक्कराचा करंट लागुन मृत्यु कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.५ धरमनगर कन्हान येथील स्ट्रीट लाईट खांबाला करंट येत असुन जवळच्या घरची एक लहान मुलगी थोडक्यात वाचली. तर दोन डुक्करांचा या खांबाचा विधृत शॉक लागुन मुत्यु झाल्याने नगरपरिषद प्रशासनाने या विधृत […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta