क्रिडामंत्री सुनिल केदारांनी केली विठुमाऊलीची पूजा

क्रिडामंत्री सुनिल केदारांनी केली विठुमाऊलीची पूजा
सावनेर : आषाढी गुरुपौर्णिमा द्वितीयेला विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे दरवर्षी विठ्ठल रुक्मिणी मंदिर यात्रा महोत्सव साजरा केला जातो . यावर्षी कोविड १ ९ कोरोना संसर्गामुळे धापेवाडा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला होता . विठ्ठलाची महापूजा राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास व दुग्धविकास व क्रिडामंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पार पडली . विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोमवारी पहाटे ४ वाजता सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून छोटेखानी महापूजा करण्यात आली. विठ्ठलाच्या चरणी मंत्र्यांनी जनजीवन सामान्य होऊ दे , आलेले संकट टळू दे असे साकडे घातले.

यावेळी कळमेश्वर तालुका खरेदी – विक्री समिती अध्यक्ष बाबारावजी कोढे , सौ.शालूताई कोढे प्रामुख्याने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मौदा नगरपंचायतच्या भोंगळ नियोजनामुळे सर्वेयरचा जीव भांडयात...

Sat Jul 18 , 2020
मौदा नगरपंचायतच्या भोंगळ नियोजनामुळे सर्वेयरचा जीव भांडयात… मौदा पत्रकार संघाने केली मुख्याधिकारी कराळे यांच्यावर कारवाईची मागणी … मौदा :  देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. .ग्रामीण भागातही जोर धरू लागला आहे, आतापर्यंत शुन्य असणाऱ्या मौदा शहरात दोन रुग्ण आढळून आले या काळात आपले जीव धोक्यात घालून […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta