*बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी*
कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .

सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर ला बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता सुरज वरखडे , महादेव लिल्हारे सह आदिंनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , महेंद्र साबरे , हरीओम प्रकाश नारायण , महादेव लिल्हारे , हर्ष पाटील , शाहरुख खान , प्रकाश कुर्वे , महेश शेंडे , भरत सावळे , कामेश्वर शर्मा , अक्षय फुले , चंदन मेश्राम , किरण ठाकुर सह आदि मंच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .