रेल्वेच्या तिसऱ्या मार्गामुळे स्टेशन रोड परिसरत  सम्भाव्य धोक्यावर पावसाळ्यापुर्वी उपाय करा

रेल्वेच्या तिसऱ्या मार्गामुळे स्टेशन रोड परिसरत  सम्भाव्य धोक्यावर पावसाळ्यापुर्वी उपाय करा. 

#) कन्हान शहर काॅंग्रेस कमेटीचे न प मुख्याधिकारी ला निवेदन. 


कन्हान : –  नगरपरिषद अंतर्गत गेल्या काही दिवसा पासुन रेल्वेच्या तिस-या लाईनेचे काम सुरु असुन हळु हळु काम स्टेशन रोड परिसरत होत असल्यामुळे येथे उध्दभवणा-या सम्भाव्य धोक्यावर पावसाळ्यापुर्वी योग्य उपाय योजना करण्याची मागणी कन्हान शहर काॅंग्रेस कमेटी व्दारे न प मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

        कन्हान शहरात सुरु असलेल्या रेल्वेच्या तिस-या रुळाच्या कामामुळे रेल्वे स्टेशन रोड परिसरातील नाग रिकांना पावसाळ्यात मोठ्या संकटाशी सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे रूळा लगत मोठ्या प्रमाणात खोलगट भाग असुन पावसा ळ्यात शहरातुन वाहुन येणारे पाणी रेल्वे रूळाखाली ल पाईप व्दारे पलीकडे सत्रापुर नाल्याने नदीत जात होते. परंतु रेल्वे द्वारे या नाल्यावर मातीचे भरण टाकुन बुजविण्यात येत असल्याने पावसाळ्यात संपुर्ण पाणी वस्तीमध्ये जमा होऊन लोकांची घरे पाण्याखाली बुड ण्याचा धोका निर्माण झाला आहे. यात गवळीपुरा, गोंड मोहल्ला, दलित वस्ती भागातील नागरिकांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद केला जात असुन नगरपरि षदेची पाईप लाईन व रस्ता देखील रेल्वे रूळाखाली जाणार असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करा वा लागण्याची दाट शक्यता वाढली असुन पुर्ण वस्तीचा उतार याच भागात येत असल्यामुळे शहराचे  पाणी याच वस्तीत पावसाळ्यात जमा होऊन पुर्ण वस्तीच बुडण्याचा धोका निर्माण झाल्याने कन्हान शहर काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष व नगरसेवक राजेश यादव यांच्या नेतृत्वात न प मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करून निवेदन देत तातडीने उपाय योजना करण्याची आवश्य कता असल्याने रेल्वे प्रशासनाशी तातडीने कार्यवाही करून संभाव्य संकटावर तातडीने मार्ग काढण्याची युद्ध पातळीवर कारवाई करावी अशी मागणी करण्या त आली आहे . याप्रसंगी कन्हान शहर काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष व नगरसेवक राजेश यादव, नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे , नगरसेविका कल्पना नितनवरे, पंकज गजभिये सह नागरिक उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

 वराडा येथील ५४% जळालेल्या महिलेचा मृत्यु

Thu Jun 10 , 2021
वराडा येथील ५४% जळालेल्या महिलेचा मृत्यु.  कन्हान : – वराडा येथील महिला सौ संगिता उईके ही घरी स्वयंपाक करताना चुलीची आग साडीस लागुन जळाल्याने तिचा २२ दिवसानी उपचारा दरम्यान मेडीकल नागपुर ला मुत्यु झाल्याने कन्हान पोस्टे ला मर्ग दाखल करण्यात आला.         बुधवार (दि.१२) मे ला रात्री ९.३० वाजता […]

You May Like

Archives

Categories

Meta