शासन नियमाचे पालन करून कोरोना महामारी हद्दपार करा.   

शासन नियमाचे पालन करून कोरोना महामारी हद्दपार करा. 

#) कन्हान स्थानिक प्रशासनाने केली दुकाने बंद. 

#) शासनाच्या नियमाचे पालन न करणा-यावर नगरपरिषद द्वारे दंडात्मक कारवाई शुरू. 


कन्हान : – महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने  नियमावली कठोर केली असुन गर्दी टाळण्याकरिता राज्यात कलम १४४ लागु केली असुन कन्हान शहरात मंगळवार (दि.६) एप्रिल ला व्यापारांनी आपले दुकाने सुरु केली असता नगरपरिषद कन्हान मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, कन्हान थानेदार सुजितकुमार श्रीरसागर आपल्या कर्मचारी ताफ्या सह शहरात फिरून शासना च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून कोरोना महा मारी हद्दपार करा. असे भावनिक आवाहन केले.       

   

   महाराष्ट्र राज्यात वाढत्या कोरोना विषाणु महामारी वर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन राज्य शासनाने नियमावली कठोर केली असुन गर्दी टाळण्याकरिता राज्यात कलम १४४ लागु करण्यात आली असुन सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस महत्वाच्या योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातुन वैद्यकीय व इतर अतिआवश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. सध्याचा परिस्थितीत कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगर परिषद क्षेत्रात दिनांक ०५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत राज्य शासनाने अतिआवश्यक सेवांची दुकान वगळता बाकी सर्व दुकानें बंद करण्याचे आदेश जारी केले असुन किराणा, भाजीपाला व जिवनाश्यक  वस्तु वगळता इतर सर्व प्रकारचे दुकाने माॅल्स, बाजार पेठा दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहे. अतिआवश्यक वस्तु , सेवांच्या दुकानांतील दुकानदार व कर्मचा-यानी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, स्वत व ग्राहकांकडुन नियममाचे पालन होत आहे का नाही ते पाहावे. मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद करण्यात आली असुन सलुन, ब्युटी पार्लर, सभागृहे, जलतरण तलाव, जिम्स, धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी काम करणारे कर्मचारी व पुजारी यांना पुजा अर्चना करता येईल. उपहारगृहे व बार पुर्णपणे बंद करण्यात आले असुन उपगृहामध्ये एखाद्या हाॅटेलचा भाग असेल तर तेथे राहणा-या अभ्यागातासाठी सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सुविधा स.  ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले आहे. तसेच रस्त्याचा कडेला असणा-या खाद्य विक्रे त्यांना स. ७ ते ८ पर्यंत केवळ पार्सल सेवेस व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणा-या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमाचे पालन करावे लागेल. पालन न केल्यास व्यवसायी दुकानें बंद करण्यात येईल. ई काॅम र्स सेवा नियमितपणे स.७ ते रात्री८ वेळेत सुरू राहील. होम डिलीव्हरी देणा-या कर्मचा-यांचे लसीकरण झाले ले असणे अतिआवश्यक असुन लसीकरण करून घेई पर्यंत सदर कर्मचा-याने निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस १००० रू. दंड आणि संस्थेस १०,००० रुपये दंड वसुल करण्यात येईल. वृत्तपत्रे छपाई व वितरण नेहमी प्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे. सार्वजनिक व खाजगी अशी सर्व प्रकारची वाहतुक नियमितपणे सुरू राहतील. ऑटोरिक्षा मध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सी मध्ये चाल क व निश्चित केलेल्या प्रवांशापैकी ५०% टक्के प्रवाशी प्रवास करू शकतील. जे नागरिक बिना मास्क प्रवास करतांना आढळतील त्यांच्या कडुन ५०० रू दंड वसुल करण्यात येईल. सार्वजनिक व खाजगी बसेस मध्ये उभे राहुन प्रवास करता येणार नाही. परंतु सीट वर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी असणार व प्रवाशांनी मास्क घातलेला असावा. बस चालक वाहक व इतर कर्मचा-यानी आपले लसीकरण पुर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत बाळगावे. बाहेर जाणा-या रेल्वे मध्ये सर्व साधारण डब्यात उभ्याने प्रवासी असु नयेत. प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे. खाजगी कार्यालयीन पुर्णपणे वर्क फ्राॅम होम बंधनकारक राहील. केवळ बॅंका, स्टाॅक मार्केट,औषधी, मेडिक्लेम, दुरसंचार अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्था पन वीज, पाणीपुरवठा, करणारी कार्यालय मात्र सुरु राहतील. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० लो कांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असुन सदर ठिकाणी उपस्थित व्यक्तीचे लसीकरण होणे आवश्यक असुन लसीकरण होईपर्यंत सदर व्यक्तीने निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. अंतिम संस्कार च्या वेळेस जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. अश्या प्रकारे राज्य शासनाने नियमावली कठोर केली असुन नियमाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व ५६ आणि भारतीय दंड संहिताचे कलम १८८ अंतर्गत आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शासनाच्या सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करून शहरातुन, राज्यातुन कोरोना मुक्त करण्याकरिता प्रशासनाला सहकार्य करून नियमाचे पालन करा, कोरोना टाळा. असे भावनिक आवाहन नगरपरिषद कन्हान – पिपरी व कन्हान पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान, साटक ला ३७२ नागरिकांना लसीकरणा चा लाभ

Thu Apr 8 , 2021
कन्हान, साटक ला ३७२ नागरिकांना लसीकरणा चा लाभ    #) प्राथ.आरोग्य केंद्र कन्हान १०५,कांद्री ४३, टेका डी ७२ व साटक १५२ अश्या ३७२ लसीकरण.  कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ४५ वर्ष व वरील नागरिकां ना कन्हान १०५, कांद्री ४३, टेकाडी ७२ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे १५२ […]

You May Like

Archives

Categories

Meta