कन्हान, साटक ला ३७२ नागरिकांना लसीकरणा चा लाभ

कन्हान, साटक ला ३७२ नागरिकांना लसीकरणा चा लाभ   

#) प्राथ.आरोग्य केंद्र कन्हान १०५,कांद्री ४३, टेका डी ७२ व साटक १५२ अश्या ३७२ लसीकरण. 

कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ४५ वर्ष व वरील नागरिकां ना कन्हान १०५, कांद्री ४३, टेकाडी ७२ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे १५२ अश्या ३७२ कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला. (दि.५) मार्च पासुन आतापर्यंत कन्हान, साटक या केंद्रा व्दारे कन्हान परिसरात एकुण ५७५८ लसीकरण करण्यात आले आहे. 

      शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील  जेष्ठ नागरिक आणि (दि.१) एप्रिल ला ४५ वर्ष व वरी ल नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्या करिता प्रतिबंधक लस लावणे सुरू केले असुन बुधवार (दि.७) एप्रिल ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १०५, उपकेंद्र कांद्री ४३, टेकाडी ७२ व प्राथमिक आरो ग्य केंद्र साटक व्दारे १५२ असे ३७२ नागरिकांना को रोना प्रतिबंधक लस लावण्यात आली. आता पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे २८३१, कांद्री ३९२ वेकोलि जे.एन दवाखाना कांद्री ४०५, टेकाडी ५७० व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक १७५१ असे (दि.५) मार्च पासुन आता पर्यंत कन्हान परिसरात एकुण ५७५८ लसीकरण करण्यात आले आहे. याकरि ता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, कोरो ना विभाग तालुका प्रमुख डॉ अन्सारी यांच्या मार्गदर्श नात प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानचे डॉ योगेंद्र चौधरी व प्राथमिक आरोग्य केंद्र साटकच्या डॉ वैशाली हिंगे, वेकोलि जे एन दवाखाना डॉ विजया माने सह सर्व कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत. दिवसेदिवस कन्हा न परिसर व नागपुर जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कुठल्याही खोटया प्रचाराला बळी न पडता कोरोना लस लावुन घेणे आवश्यक असुन नाग रिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून आपली व कुंटुबा ची काळजी घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानचे डॉ योगेश चौधरी व साटक च्या वैशाली हिंगे हयानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कामगारांवर अन्याय, व्यवस्थापनाची दडपशाही, शासनाची यंत्रणा झोपी,व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करा :- महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची मागणी

Thu Apr 8 , 2021
  *कामगारांवर अन्याय, व्यवस्थापनाची दडपशाही, शासनाची यंत्रणा झोपी,व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करा :- महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची मागणी*  आज पर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांना नियमानुसार ८.३३% बोनस दिलाच गेला नाही. जो कामगार कामगारांच्या हक्काचे वेतन यावर चर्चा करण्यासाठी व्यवस्थापकडे जातो त्याला कामावरून कमी केल्या जाते, कामगारांचे वेतन (कोरोना काळात काम केल्याचे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta