शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी प्रणाली लागु करण्याबाबत लवकरच बैठक घेणार – रश्मी बर्वे

शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी प्रणाली लागु करण्याबाबत लवकरच बैठक घेणार – रश्मी बर्वे

    

#) अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी. 

कन्हान : – जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन उशीरा होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे.वेतन विलंबास सध्याची वेळ खाऊ पद्धत कारणीभूत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणाली द्वारे करावी अशी मागणी जि. प. अध्यक्षा रश्मी बर्वे, शिक्षण सभापती भारती पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी ( प्राथ.) यांच्याकडे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे यांचे नेतृत्वात प्रतिनिधी मंडळाने केली. यासाठी लवकरच एक बैठक लावुन निर्णय घेण्याचे आश्वासन जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी दिले. 

         सध्याच्या पद्धतीत जिपच्या वित्त विभागातून आरटीजीएस द्वारे वेतनाचे आवंटन सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍याचे खात्यावर जमा केले जाते. पुढे गटविकास अधिकारी कार्यालया कडुन वेतनाचा धनादेश व वेतन देयक बँकेत सादर केले जाते. हे करत असतांना काही पंचायत समित्त्या लवकर बील बँकेला सादर करीत नाही त्यामुळे बील बँकेत जायला विलंब होतो, पुढे बील बँकेत गैल्यानंतर बँकेकडुन आपापल्या सोयीने एक दोन दिवसांनी शिक्षकांच्या खात्यावर जमा केल्या जाते. अशा प्रकार ची किचकट व वेळखाऊ पद्धत असल्यामुळे शासनाकडुन अनेकदा शासन निर्णय काढुनही कधीच वेळेवर शिक्षकांचे वेतन होत नाही.      त्यामुळे या कीचकट वेळखाऊ प्रक्रिये ऐवजी सीएमपी प्रणाली लागु केल्यास मधला डीडीओ स्तरावरचा टप्पा कमी होऊन जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षकांचे पगार थेट जिल्हा स्तरावरुन एका क्लिकवर एकाच दिवशी सर्व शिक्षकांच्या खात्यावर जमा होईल. तसेच अशा सकीय कपातीचा निधी बीडीओ चे खात्यावर जाऊन पुर्वी प्रमाणेच पंचायत समिती स्तरावरून पतसंस्था, एलआयसी अशा संबंधीत वित्तीय संस्थांना पाठविल्या जाईल. आतापर्यंत राज्यात उस्मानाबादसह नऊ जिल्हा परिषदेत ही पद्धत लागु करण्यात आलेली आहे. त्यामुळे सीएमपी प्रणाली लागु करून शिक्षकांचे वेतन वेळेवर करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा नागपुर व्दारे गोपालराव चरडे, रामु गोतमारे, सुनिल पेटकर, सुभाष गायधने, ज्ञानेश्वर वंजारी, प्रकाश बांबल, धनराज बोडे, आनंद गिरडकर, निलेश राठोड, विरेंद्र वाघमारे, पंजाब राठोड, लोकेश सुर्यवंशी, दिलीप जिभकाटे, उज्वल रोकडे, अशोक बावनकुळे, संजय शिंगारे, विजय बिडवाईक, किशोर रोगे, दिनकर कावळे, रविंद्र घायवट, संजय घारपूरे, ओमदेव मेश्राम, उमेश आष्टनकर, राजेश मथूरे, राजेश वैरागडे, रामेश्वर थोटे, प्रभाकर बाळापूरे, आशा झील्पे, सिंधू टिपरे आदी पदाधिका-यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कोलितमारा ची आदिवासी आश्रमशाळाचे "शिक्षण आपल्या दारी" ने संदीप शेन्डे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Sun Oct 11 , 2020
*कोलितमारा ची आदिवासी आश्रमशाळाचे “शिक्षण आपल्या दारी”ने संदीप शेड़े शिक्षक ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर* कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी(ता प्र) : स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर फाउंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०’ देशभरातील १६९,राज्यातिल ६ शिक्षक प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी […]

You May Like

Archives

Categories

Meta