कामाक्षी सेलिब्रेशन तर्फे रामलला प्राणप्रतिष्ठा निमित्त भव्य महाप्रसाद

सावनेर :  कामाक्षी सेलिब्रेशन सावनेर येथे, अयोध्या मधील श्रीराम भगवान यांच्या प्राणप्रतिष्ठा समारोहाचे निमित्त साधून, दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत, भव्य महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. याद्वारे सर्व भाविक मंडळींना पंचपक्वान्नाचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण भारतवर्षामध्ये श्रीराम भगवान यांच्या प्राणप्रतिस्थापनेमुळे जे ईश्वरीय वातावरण निर्माण झालेले आहे, त्याचा आनंद उत्सव याद्वारे सावनेर नगरीमध्ये वेगळ्या वेगळ्या परिसरामध्ये साजरा करण्यात आला. त्यामध्येच कामाक्षी सेलिब्रेशन नी देखील, या समाजामध्ये, आपला अनमोल वाटा, या समाजकार्याकरिता सादर केला. भव्य महाप्रसादाचा आस्वाद जवळपास बाराशे ते पंधराशे लोकांनी घेतला.

तसेच या कार्यक्रमाचे आयोजनासाठी ऍडव्होकेट श्री मनोहर बाळकृष्ण घाटोडे, श्री पंकज कुमार घाटोडे, डॉक्टर पराग मनोहर घाटोडे, रत्नमाला मनोहर घाटोडे, अश्विनी पंकज कुमार घाटोडे, डॉक्टर सुजाता पराग घाटोडे, श्री अरुण वाडि, श्री संदीप जी बावणे तसेच संपूर्ण कामाक्षी परिवार यांचा सिंहाचा वाटा होता. समाजकार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे कामाक्षी सेलिब्रेशन यांनी या महाप्रसाद वितरणाची संपूर्ण जबाबदारी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

Tue Jan 23 , 2024
हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी कन्हान,ता.२३ जानेवारी    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय जे एन रोड कन्हान येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त १०१ किलो बुंदी व फळ वितरण करून जयंती साजरी करण्यात आली.      मंगळवार (दि.२३) जानेवारी २०२४ ला शिव सेना उद्धव बाळासाहेब […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta