सलील देशमुख हस्ते शा.राजेंद्र बावनकुळे यांच्या सत्कार

सलील देशमुख हस्ते शा.राजेंद्र बावनकुळे यांच्या सत्कार

नागपूर,ता.०१ फेब्रुवारी

      मकर संक्रांत महोत्सव निमित्त पंचक्रोशी हनुमान देवस्थान सोनेगाव (रिठी) येथे भव्य ग्रामीण स्तरावर महिला व बाल भजन स्पर्धा व सुखदास गाडेकर महाराज पाटसूल यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.

    यावेळी कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व गावातील लोकांनी सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला. प्रसंगी शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे, शाहीर भगवान लांजेवार, शाहीर विनायक नागमोते यांना सलील देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

   कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, जिल्हा परिषद सभापती प्रवीण उर्फ बालु जोध, राजेंद्र बावनकुळे, प्रवीण मोरोडीया, विपिन चापले  तसेच ग्रामपंचायत सरपंच खराशी सिंधुताई जोध,‌अध्यक्ष जितु  जोध सचिव योगेश  सावरकर उपाध्यक्ष नरू काका दंडारे विलास काटोले‌ प्रयत्न केला.

 तसेच बंडूभाऊ येवले, पांडुरंगजी घागरे, दीपकराव गेडाम, चेतन  किनकर, सतीश गाखरे, विजुभाऊ ठाकरे, शिवकुमारजी उघडे,  प्रफुल कीनकर, बबनरावजी बन्नगरे ,कांतेश्वर गोरे, राहुल गोरे, प्रशांत पेठे, अरविंद गोरे, संजू  ढोक, प्रशांत  काटोले, राहुल,  कामडी, मनोज  गोरे, मयूर गोरे, पवन बर्डे, अक्षय सोनवणे, सावरकर, दिलीप चापले, भीमराव डोबले, जानरावजी गोरे, अनिल  पांडे, जीवन सुरजुसे, ललित फंदी आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील दहा ते बारा हजार लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शाहीर ब्रम्हा नवघरे यांचे शाल‌ व‌ सन्मानचिन्ह देऊन सत्कार मंडई निमित्त नेरला येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 

Wed Feb 1 , 2023
शाहीर ब्रम्हा नवघरे यांचे शाल‌ व‌ सन्मानचिन्ह देऊन सत्कार मंडई निमित्त नेरला येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नागपूर,ता.१ फेब्रुवारी       मौदा तालुक्यातील नेरला येथे मंडई निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे शुक्रवार ( दि.२७) रोजी आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कलावंत सहभागी होऊन लोकांचे लक्ष वेधले होते. रामटेक विधानसभा […]

You May Like

Archives

Categories

Meta