आरोग्य कर्मचा-यास मारहाण व शिवीगाळ केल्या च्या निषेधार्थ १ दिवस कामबंद आंदोलन केले

आरोग्य कर्मचा-यास मारहाण व शिवीगाळ केल्या च्या निषेधार्थ १ दिवस कामबंद आंदोलन केले

#) नरखेड तालुक्यातील खंडाळा ला आरोग्य कर्मचा-याशी अपनास्पद वर्तणुकीच्या निषेधार्थ.

कन्हान : – कोविड लसीकरणात नरखेड तालुक्यातील खंडाळा गावच्या सरपंचाने आरोग्य कर्मचा-यास शिवीगाळ करून मारहाण करित भ्रमणध्वनी वरून आरोग्य अधिका-यास शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ नागपुर जिल्हा आरोग्य कर्मचा-यांनी आपात्काळ सेवा वगळता एक दिवसाचे आरोग्य सेवेचे काम बंद आंदोलन पुकारल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक च्या सर्व आरोग्य कर्मचा-यानी एक दिवस आरोग्य सेवेचे काम बंद ठेवुन घटनेचा निषेध केला.
मंगळवार (दि.४) जानेवारी २०२२ ला कोविड लसीकरण काम करित असताना नरखेड तालुक्यातील खंडाळा (बु) येथे सरपंच श्री मुंदाफळे यानी आरोग्य सेवक कर्मचा-यास मारहाण व शिवीगाळ करून अपमानास्पद वर्तवणुक करित वैद्यकीय अधिकारी याना भ्रमणध्वनी यंत्रावरून शिवीगाळ केल्याचा निषेधार्थ नागपुर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व आरोग्य कर्मचा-या नी बुधवार (दि.५) जानेवारी २०२२ ला आपात्कालीन सेवा वगळुन आरोग्य सेवेचे काम बंद आंदोलन पुकारण्यात आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साट क केंद्राच्या सर्व आरोग्य कर्मचा-यानी आपात्कालीन सेवा वगळुन आरोग्य सेवेचे काम बंद आंदोलन करून घटनेचा निषेधाचे निवेदन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी हयाना देऊन प्रतिलिपी मा. जिल्हा व तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी हयाना पाठवुन निषेध नोंदविण्यात आला.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ सरवत हैदरी, डॉ माधुरी चेरेकर, डॉ जयश्री मेश्राम, डॉ नेहा पटेल, डॉ स्वाती गोस्वामी, डॉ पंकज रोजगे, आरोग्य कर्मचारी एस एल पवार, पी एस ढोक, एस डी बाव नकर, सोफिया शेख, कांबळे, अरविंद वनकर, क्रिष्णा मेश्राम, महेंद्र सागोंडे, मनोज खोब्रागडे , सुरेंद्र गि-हे, राहुल जगताप, श्वेता मेश्राम, जया लाटकर, वैष्णवी माकडे, आशिष कोल्हे, आशिष देशमुख, माया शेंडे, श्रवण इंगळे, फरहाण सैय्यद, बागडे, लुटे, जोगकर, जामनिक, भलावी, परते, गाणार सह कन्हान व साटक प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या सर्व कर्मचा-यांनी आंदोलन यशस्वी करित घटनेचा निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नेशनल इन्श्योरेन्स व्दारे अपघातात मुत्यु विमा धारकाच्या वारसाना १५ लाखाचा धनादेश दिला

Wed Jan 5 , 2022
नेशनल इन्श्योरेन्स व्दारे अपघातात मुत्यु विमा धारकाच्या वारसाना १५ लाखाचा धनादेश दिला कन्हान :- नेशनल इन्श्योरेन्स कंपनी व्दारे पटेल नगर कन्हान येथील विमाधारक स्वर्गीय अनिल तिरपुडे यां चा साई मंदीर जवळ दुचाकी अपघातात मुत्यु झाल्या ने विमा कंपनी ने त्याच्या वारसाना १५ लाखाचा धना देश देऊन आर्थिक मदत करण्यात आली. […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta