गटनेते सह १ ९ सदस्य अपात्र ठरविण्याचे आदेश : काटोल

काटोल  : नगर परिषद नगराध्यक्ष , उपाध्यक्ष , गटनेते सह १ ९ सदस्य अपात्र ठरविण्याचे आदेश महाराष्ट्र नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज ( शुक्रवारी ) काढल्याने खळबळ उडाली . काटोल येथील अर्जदार राधेश्याम बासेवार , राजेश राठी , नगरसेवक संदीप वंजारी यांनी वेगवेगळ्या व काही संयुक्त अशा चार वेगवेगळ्या तक्रारी नगर विकास मंत्रालयाकडे केल्या होत्या . नगर विकास मंत्रालयासमोर ११ नोव्हेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे झालेल्या
सुनावणीनंतर वरील अपात्रतेचे ( अनर्ह ) आदेश काढण्यात आले . अर्जदार राधेश्याम बासेवार यांच्याशी मोबाईलवर साधलेल्या संपर्कात विचारले असता विद्यमान नगराध्यक्ष वैशाली ठाकूर , तत्कालीन उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर व गटनेते चरणसिंग ठाकूर यांनी पदाचा दुरुपयोग केला असल्याचे सांगितले . त्यामुळे नगर विकास मंत्रालयात दाद मागितली . त्यांच्या विरुद्ध एकूण चार प्रकरणे होती . यात क्रीडांगणाच्या आरक्षित जागेवर घरकुल योजना राबविणे , पंचवटी म्हाडाच्या जागेत पूर्वी बांधलेले बाजार ओटे कुठलीही परवानगी न घेता तोडणे व त्यामुळे नगर परिषदेचा झालेल्या निधीचा गैरउपयोग , मर्जीतील लोकांना घरकुल देणे , पंतप्रधान आवास योजनेत शासनाचे निर्णयाचे विरुद्ध एकपुस्त रक्कम न देता न.प. फंडातून बिल अदा करणे आदी प्रकरणे असल्याची माहिती मिळाली.

न.प. गट नेते चरणसिंग ठाकुर : , मी समाजाकरिता चांगले काम केले असून माझी ही यात्रा थांबणार नाही , मी कुणालाही दोष देत नसल्याचे त्यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महामानव प्रेरणाश्रोत यांना विनम्र अभिवादन

Sun Dec 6 , 2020
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महामानव प्रेरणाश्रोत यांना विनम्र अभिवादन कन्हान : पददलित, शोषित व वंचित समजामध्ये ज्ञान आणि आत्मभानाचे सामर्थ पेरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करण्याचे उद्दीष्ट बाळगून आम्ही वाटचाल करीत आहोत. भारत देशाच्या नवउभारणीसाठी समता आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार आणि संविधानिक मूल्यांचा भक्कम गाभा देणारे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

You May Like

Archives

Categories

Meta