राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महामानव प्रेरणाश्रोत यांना विनम्र अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महामानव प्रेरणाश्रोत यांना विनम्र अभिवादन

कन्हान : पददलित, शोषित व वंचित समजामध्ये ज्ञान आणि आत्मभानाचे सामर्थ पेरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करण्याचे उद्दीष्ट बाळगून आम्ही वाटचाल करीत आहोत. भारत देशाच्या नवउभारणीसाठी समता आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार आणि संविधानिक मूल्यांचा भक्कम गाभा देणारे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा वारसा जोपासण्यासाठी आम्ही वचनबद्द आहोत. अशी प्रतिज्ञा विश्वरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आंबेडकर चौक कन्हान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महामानवाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चंद्रशेखर भीमटे, तालुका कार्याध्यक्ष पुरण तांडेकर, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यभान फरकाडे, ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश गोडघाटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मानकर, नगरपरिषद उपाध्यक्ष योगेश रंगारी, वरिष्ठ कार्यकर्ते अशोक पाटील, नरेश सोनेकर, धरमपाल वाघमारे, विवेक पाटील सह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

महापरिनिर्वाण दिवस थटात साजरा

Sun Dec 6 , 2020
*महापरिनिर्वाण दिवस थटात साजरा* कन्हान – महापरिनिर्वाण दिवस निमित्य भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली. रविवार दिनांक 06 डिंसेबर महापरिनिर्वाण दिवस निमित्य भाजपा कन्हान शहर च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे […]

Breaking News

Archives

Categories

Meta