महावितरण कंपनी द्वारे सवलत देवुन घरगुती विज कापणी थांबवावी

महावितरण कंपनी द्वारे सवलत देवुन घरगुती विज कापणी थांबवावी

कन्हान ता.15 मार्च 

   घरगुती विज बिल न भरल्याने महावितरण कंपनी द्वारे कन्हान शहरात अंतर्गत विज कापणी करीत असून यावर सवलत देवुन घरगुती विज कापणी थांबवावी अशी 

उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्याशी चर्चा व निवेदनातून युवा सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांच्याद्वारे मागणी करण्यात आली.

    कन्हान शहरात कोव्हीड 19 संसर्गजन्य रोगराईचा तीव्र गतीने फैलाव सुरू आहे. अशातच राज्य सरकारकडुन मागील वर्षापासन ते आजपर्यंत यावर ताळेबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन या सारख्य   उपाययोजना राबवुन रोगराई थांबविण्याचा प्रयन्त सुरू आहे शहरात नांगरीक कुंटूबांचे उपजिवीका, उदरनिर्वाह चालविण्याकरीता संसाधन सर्वत्र कमी झाले असून नागरीगण कुंटूबिय आर्थिक, माणसीक, शाररीक दृष्ट्या त्रस्त आहे अशातच कन्हान शहरामधे महावितरण कंपनीने घरगुती विज कापणी अभियान सुरू केले असून  यामध्ये काही नागरी कुटूंबियांची परीस्थीती लॉकडाऊनमुळे अत्यंत बिकट, हालाखाची झाली असून घरगुती वीज बिल देयके भरणे शक्य झाले नाही या सबंधीत विषयाचे गांभीर्याने घेवुन युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार यांच्या नेतृत्वात एक शिष्ठमंडळ कन्हान येथील महावितरण कार्यलय येथे जावुन विभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांची भेट घेत वरील विषयाबद्दल चर्चा करीत सांगितले की, ज्या नागरी कंटूबियांनी घरगुती विज बिल देयके न भरल्याने त्यांना थोडाफार वेळ, सवलत द्यावे तसेच विज कापणी अभियान थांबवण्याची विंनती करण्यात आले तसेच जि.प. अध्यक्ष रश्मीताई बर्वे यांना ही अवगत केले याावेळी प्रशांत बाजीराव मसार, नितीण मेश्राम, पकंज गजभिए , सुरेश वाघमारे, अमोल साकोरे, मोरेश्वर भोयर, चंदन मेश्राम, अविनाश हातागडे, गणेश भालेकर, शुभम मांदुरकर आदी उपस्थीत होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वराडा ला ३५ रूग्ण आढळुन कोरोना हॉटस्पाट 

Mon Mar 15 , 2021
वराडा ला ३५ रूग्ण आढळुन कोरोना हॉटस्पाट  #) वराडा गावात एकुण ८९ कोरोना बाधित.  कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र साटक अंतर्गत उप केंद्र वराडा गावात (दि.१२) ला १६ रूग्ण आढळल्याने (दि.१३) मार्च ला शिबीर लावुन रॅपेट ८२ चाचणीत २३ रूग्ण आढळले तर कन्हान व खाजगीतुन ३ आज (दि.१५) ला रॅपेट ८० […]

You May Like

Archives

Categories

Meta