कन्हान नदीचा पात्रात अनोळखी मृतदेह

 

कन्हान नदीचा पात्रात अनोळखी मृतदेह

कन्हान,ता.06 ऑगस्ट

   कन्हान नदीच्या सिहोरा घाट नदी पात्रात मासे पकडण्यास गेलेल्या गोताखोर युवकांना नदीत तैरतांना एका अनोळखी इसमाचा प्रेत दिसुन आल्याने कन्हान पोलीसांना माहीती देऊन नदीतुन बाहेर काढुन पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. अनोळखी पुरूषाचे मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शनिवार (ता.६) रोजी दुपारी ३ ते ५ वा. दरम्यान काही गोताखोर राकेश मेश्राम, अजय बावने आणी प्रकाश डोंगरे हे मासे पकडण्यासाठी कन्हान नदीच्या सिहोरा घाट नदी पात्रात गेले असता त्यांना नदी मध्ये एका अनोळखी इसमाचे प्रेत तैरतांना दिसुन आले. त्यांनी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक विलास काळे ताफ्यासह घटनास्थळी पोहचुन पोलीसांनी गोताखोर युवकांच्या मदतीने अनोळखी इसमाचा मृतदेह नदी पात्रातुन बाहेर काढला. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आला. सदर अनोळखी पुरूषा चा मृतदेह अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयाचा असुन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. कमरेत लक्स विनर्स कंपनी ची कथीया रंगाची ९० सें मी. ची अंडरपॅंट आहे व काळ्या रंगाची एफजी स्पोर्ट असे नमुद असलेली फुल पॅंट घातलेली असुन उंची अंदाजे ५ फुट ८ इंच आहे. अनोळखी मृतकास कोणी ओळखत असल्यास कन्हान ठाणेदार विलास काळे दूरध्वनी क्र. ९८६७११२१८५ वर संपर्क करून मृतकास ओळखण्यास सहकार्य करावे. पुढील तपास पो.नि.विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

चौघांनी युवकाला चोप देत मोबाईल व खिश्यातील १४००० रू हिसकावले 

Sat Aug 6 , 2022
  चौघांनी युवकाला चोप देत मोबाईल व खिश्यातील १४००० रू हिसकावले  तिन आरोपी स्वत: सरेंडर तर एक आरोपी अद्याप फरार. कन्हान,ता.06 ऑगस्ट    पोलीस स्टेशन हददीत असलेल्या राजीक पान पॅलेस दुकाना समोर चार युवकांनी शिवम पुरी च्या गालावर झापड मारून त्यास हाता- पायाने मारून त्याचा मोबाइल हिसकवुन त्याच्या खिशातुन १४,००० […]

You May Like

Archives

Categories

Meta