श्री दत्तात्रय जयंती महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

श्री दत्तात्रय जयंती महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

कन्हान,ता.९ डिसेंबर

    कांद्री – कन्हान परिसरातील श्री दत्त मंदिरात श्री. दत्तात्रैय जयंती महोत्सव श्रीमद भागवत पारायण, हरिपाठ, काकडा भजन, रामायण पाठ, हरिभजन व पालखी मिरवणुकी सह आदि विविध कार्यक्रमाने श्री. दत्तात्रैय जयंती सोहळा साजरा करण्यात आला.

   मार्गशिर्ष शुक्ल पक्ष ८ गुरुवार (दि.१) डिसेंबर २०२२ ला कांद्री येथे श्री.दत्त मंदिरात दुपारी १२ वाजता घटस्थापना करण्यात आली. दररोज सकाळी ज्योत ६ ते ७, काकडा भजन दुपारी १२.३० ते २.३०, रामायण पाठ महिला मंडळ कांद्री तर्फे करण्यात आले. दररोज सायंकाळी ४ ते ६ श्रीमद भागवत पारायण कथा सादरकर्ते ह.भ.प. सौ.कल्पनाताई विजयजी देशमुख, हरिपाठ हरिभजन अरुणोदय भजन मंडळ कांद्री, दुर्गा भजन मंडळ, गुरूदेव भजन मंडळ कांद्री, दुर्गा जस भजन मंडळ टेकाडी, दुर्गा भजन मंडळ, श्री दत्त भजन मंडळ कांद्री, विठ्ठल रुख्मिनी भजन मंडळ टेकाडी व श्री गजानन महाराज भजन मंडळ कांद्री  विक्रमजी वांढरे व संच जागृती हरिभजन कांद्री व्दारे भजन किर्तन करण्यात आले.

   बुधवार (दि.७) ला श्री दत्तात्रैय जयंती दिनी सकाळी ७.३० वाजता श्री दत्तात्रेय महाराजांची पालखी नगर भ्रमण करून ठिक ठिकाणी पालखी ची पुजा अर्चना करून फुलाच्या वर्षाने, अल्पोहार, चहा, कांफी, फळ वाटप करुन पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. पालखी दुपारी परत मंदिरात पोहचुन समारोप करण्यात आला. गुरुवार (दि.८) २०२२ ला सकाळी ८ ते ११.३० पर्यत श्री दत्तात्रैय मुर्तीचा अभिषेक, हवन दुपारी १२.३० ते ३.३० पर्यंत हभप. मारोतराव जान भोर महाराज मु. बेरडी ता.सौंसर यांचे गोपाल काल्याचे किर्तन सांयकाळी ४ ते १० पर्यंत महाप्रसाद वितरण करुन श्री दत्तात्रैय जयंती सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री दत्त मंदिर भाविक मंच कमेटी कांद्री चे कवडुजी आकरे, शोभाताई वझे, नरेश पोटभरे, योगेंद्र आकरे, वामन देशमुख, शिवाजी चकोले, मारोतराव कुंभलकर, गणेश भक्ते, बंटी आकरे, रामाजी हिवरकर, गणेश हटवार, किशोर निमपुरे, रामचंद हटवार, बाळा सरोदे, जितु आकरे, बंडु बावनकुळे, प्रदीप सरोदे, हिराबाई बंजारी, वंदना पोटभरे, मालाताई भक्ते, इंदिरा पारधी, इंदिरा कुंभलकर, छाया हटवार, आशाताई हटवार सह आदी नागरिकांनी, महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

क्रिडा महोत्सवातुन चांगले खेळाडु घडतात धर्मराज प्राथमिक शाळेत चार दिवसीय क्रिडा महोत्सव

Fri Dec 9 , 2022
  क्रिडा महोत्सवातुन चांगले खेळाडु घडतात                      धर्मराज प्राथमिक शाळेत चार दिवसीय क्रिडा महोत्सव कन्हान,ता.९ डिसेंबर  शालेय जिवनात क्रिडा खेळाचे महत्त्व असुन यातुनच चांगले खेळाडु निर्माण होतात. धर्मराज शाळेने क्रिडा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यां च्या कलागुणांना वाव दिला असल्याचे प्रतिपादन उद्घाटक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta