क्रिडा महोत्सवातुन चांगले खेळाडु घडतात धर्मराज प्राथमिक शाळेत चार दिवसीय क्रिडा महोत्सव

कन्हान,ता.९ डिसेंबर
शालेय जिवनात क्रिडा खेळाचे महत्त्व असुन यातुनच चांगले खेळाडु निर्माण होतात. धर्मराज शाळेने क्रिडा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यां च्या कलागुणांना वाव दिला असल्याचे प्रतिपादन उद्घाटक धनंजय कापसीकर यांनी केले.
धर्मराज प्राथमिक शाळेत (दि.७) डिसेंबर पासुन चार दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पत्रकार श्री धनंजय कापसीकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक खिमेश बढिये तर प्रमुख पाहुणे म्हणुन पर्य वेक्षक सुरेंद्र मेश्राम उपस्थित होते. या चार दिवसीय क्रिडा महोत्सवात कबड्डी, लंगडी, रनिंग, चमचा गोटी, बेडुक उड्या, बॅलन्सींग या सारखे विविध खेळ होणार आहे.
या महोत्सवातुन विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळेल, असा आशा वाद मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी व्यक्त केला . क्रिडा महोत्सवाचे नियोजन श्री अमीत मेंघरे व कु. हर्षकला चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. कार्य क्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री भिमराव शिंदेमे श्राम सर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री अमीत मेंघरे, कु हर्षकला चौधरी, श्री भिमराव शिंदे मेश्राम, श्री किशोर जिभकाटे, कु अर्पणा बावनकुळे, कु शारदा समरीत, सौ चित्रलेखा धानफोले, श्री दिनेश ढगे, श्री सतीश राऊत, कु पूजा धांडे, कु कांचन बावन कुळे, सौ वैशाली कोहळे, सौ सुनीता मनगटे, सौ संगीता बर्वे आदी सहकार्य करित आहे.
Post Views: 168