डुमरी (कला) येथे स्वच्छता अभियांतर्गत श्रमदान

डुमरी (कला) येथे स्वच्छता अभियांतर्गत श्रमदान

कन्हान : – नेहरू युवा केंद्र नागपूर, खेल व युवा मंत्रालय भारत सरकार आणि समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी च्या संयुक्त विद्यमाने डुमरी (कला) गावा मध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत श्रमदान करून गाव स्वच्छ करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून ग्राम पंचायत व प्राथमिक शाळा आणि गाव परिसरात स्वच्छता अभियान राबवुन श्रमदान करून गाव, परिसर स्वच्छ करण्यात आले. यावेळी गावातील सरपंच रामेश्वर राऊत, उपसरपंच बडुजी भारती, स.सु.मा. ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष निलेश गाढवे, समाजसेवक नितीन बुरडे, राजे ग्रुप कन्हानचे केतन भिवगडे, रोशन सोनटक्के, ऋषिकेश देवढगळे, महेश दिवटे, हेमंत डेगे, आकाश शेलार, सुबोध डोंगरे, अविनाश बेद्रे, बळीराम चौधरी सह ग्रामस्थ उपसथित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोव्हीड -19 च्या अनुशंगाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल चालक दुकानदार यांचेवर सावनेर पोलीसांची कारवाई

Thu Jan 20 , 2022
कोव्हीड -19 च्या अनुशंगाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल चालक दुकानदार यांचेवर सावनेर पोलीसांची कारवाई सावनेर : कोव्हीड – 19 रोगाच्या अनुशंगाने राज्य सरकारने काही निर्बंध जारी कले असुन त्या बाबत मा . जिल्हादंडाधिकारी नागपुर यांनी नागपुर जिल्हयात कोव्हीड 19 च्या अनुशंगाने आदेश लागु केले आहेत . त्या आदेशाने […]

You May Like

Archives

Categories

Meta