आदिवासी गोवारी समाजाचे नारे निर्देशने तथा डफरी बजाओ आंदोलन

आदिवासी गोवारी समाजाचे नारे निर्देशने तथा डफरी बजाओ आंदोलन संपन्न


नागपूर : अखिल भारतीय आदिवासी गोवारी शक्ति संघाव्दारे कार्याध्यक्ष शेखर लसुन्ते यांचा नेतृत्वात दिनांक ७ सप्टें.
२० २० रोजी सोमवारला दुपारी २ वाजता अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय, आदिवासी विकास
भवन, गीरीपेठ,नागपूर येथे गोंडगोवारी (गोवारी) चे प्रलंबित जातवैद्यता प्रकरणे तात्काळ निकाली काढण्या बाबत नारे निर्देशने तथा डफरी बजाओ आंदोलन करण्यात आले.
मा.उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांनी दिलेल्या दिनांक १४ ऑगस्ट २०१८ व दिनांक २५ जानेवारी
२०१९ च्या निर्णया नुसार व मा. सुप्रीम कोर्ट यांचे दिनांक १५ मार्च २०१९ व दिनांक ४ ऑगस्ट२० ला दिलेल्या निर्णयानुसार
‘गोवारी‘ जमातीला ‘गोंडगोवारी‘ अनुसूचित जमातीचा लाभ देण्यात आलले आहेत. त्यानुसार ‘गोंडगोवारी‘ ( ‘गोवारी‘ ) अनुसूचित जमातीचे वैद्यता प्रमाणपत्रा करिता विद्यार्थी व सरकारी कर्मचारी यांचे अनेक प्रकरणे ७ महिण्यापासून प्रलंबित आहेत. व त्यामुळे जातवैधता प्रमाणपत्रा अभावी शैक्षणिकसत्र (२०-२१) विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान आणि सरकारी कर्मचाNयांची सेवा धोक्यात आली असून, फार मोठे संकट समाजाच्या विद्यार्थी आणि सरकारी कर्मचार्‍यांवर ओढवलेले आहेत.
 या प्रसंगी भगवान भै.भोंडे,चिंतामण वाघाडे, प्रकाशजी सोनवाने,भास्कर गोपीकिशनजी राऊत,रामदास वाघाडे,मुरलीधर सोनवाने,आकाश वाघाडे,संजय ङ्खाकरे,प्रल्हाद काळसर्पे,सौ. पुष्पाताई वाघाडे,सौ.शितल नेवारे,सौ.सिंधु वाघाडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता
परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पत्रकार माणिकराव वैद्य यांना भावपूर्ण श्रद्धांजलि

Tue Sep 8 , 2020
*मन हेलावणारी दुःखद घटना.* आयुष्य कसे जगावे तर सदैव हसत खेळत, हाच संदेश मानिकभाऊ वैद्य यांनी त्यांच्या सहवासात असणाऱ्या लहान मोठ्यांना दिला. एक उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून भाऊ सदैव सर्व नरखेड करांच्या हृदयात असतील यात शंकाच नाही. उत्कृष्ट पत्रकार ते नरखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष असा यशस्वी प्रवास त्यांनी पत्रकरीतेत केला. […]

You May Like

Archives

Categories

Meta