नगरपरिषद खापा येथिल उपाध्यक्ष निवडीवर नगरसेवक नाराज

नगरपरिषद खापा येथिल उपाध्यक्ष निवडीवर नगरसेवक नाराज

खापा :: स्थानिक नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवड मंगळवारी करण्यात आली . परंतु ज्या गटाकडे बहुमत असूनही त्यांना उपाध्यक्षपद न देता अल्पमतात असलेल्यांना उपाध्यक्षपद देण्यात आल्याने नगरपरिषदेचे वातावरण तापले आहे . अशातच दहा नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहे .
खापा नगरपरिषदेत भाजपची सत्ता असून नगराध्यक्ष हे भाजप पक्षाचे आहे . 15 नगरसेवक भाजपाचे तर एक काँग्रेस , एक अपक्ष आहे . यामध्ये दोन गट पडले असून एका गटाकडे दहा नगरसेवक असून त्यांनी देवा बोरकर यांना उपाध्यक्ष पदासाठी दावेदार मानले होते . तसेच दुसऱ्या गटाकडून मुकेश गायधनी यांना उपाध्यक्षपद देण्याचे ठरले होते . परंतु बहुमत असतानाही त्या उमेदवाराचे नाव गहाळ करुन अल्पमतात असलेले मुकेश गायधनी यांचे नाव समोर करून त्यांना उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले आणि दुसऱ्या गटाकडून देवाजी बोरकर यांना बहुमत असतांनाही डावलण्यात आले . त्यामुळे नाराज भाजपचे दहा नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे माजी उपाध्यक्ष अमोल भुते व माजी उपाध्यक्ष भूमिका डोंगरे यांनी दिलेल्या माहीतीत समोर आले . आमच्यावर दबाव असला तरी मागे हटणार नाही , असे देवाजी बोरकर , अमोल भुते , नामदेव धुर्वे , गंगुबाई कोहाड , शेषराव मसुरकर , भूमिका डोंगरे , अर्चना वरखडे , माधुरी धुर्वे , लता बुरडे , वर्षा गजभिये या नगरसेवकांनी सांगितले .
     संध्या खापा शहरातील राजकिय वातावरन तापलेले दिसुन येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महत्वपुर्ण विषयाला नामंजुर करण्याचे नगरसेवकांनी स्पष्टीकरण द्यावे- नगराध्यक्षा आष्टनकर

Thu Oct 15 , 2020
महत्वपुर्ण विषयाला नामंजुर करण्याचे नगरसेवकांनी स्पष्टीकरण द्यावे- नगराध्यक्षा आष्टनकर कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या ऑनलाईन विशेष सभेत महत्वपुर्ण सात पैकी पाच विषयाना नगरसेवकांनी नामंजुर केल्याने नागरिकांनी विकास कामाकरिता आपण सगळयांना विश्वास दाखविल्याने नगरसेवकांनी महत्वपुर्ण विषयाला नामंजुर करण्याचे स्पष्टीकरण सादर करावे. असे नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर हयानी प्रसिध्दी पत्रतुन म्हटले आहे.  […]

You May Like

Archives

Categories

Meta