कांद्रीत संताजी नगरातील घरात पावसाचे पाणी शिरले

कांद्री संताजी नगरातील घरात पावसाचे पाणी शिरले

#) कांद्री सरपंच व सदस्य व रेल्वे कर्मचा-या च्या पर्यंत्नाने पाणी निकासी समस्या सोडविली.

कन्हान : – कांद्री वार्ड क्र ५ संताजी नगर नेताजी सुभाषचंद्र पुतळा परिसरात रामटेक रेल्वे लाईन चा पुलाची साफसफाई नसल्याने रात्रीला आलेल्या जोर दार पावसाचे पाणी निकासी न झाल्याने साचुन लोकां च्या घरात शिरल्याने स्थानिय ग्रा प सदस्यानी सरपंचा ना बोलावुन संबधित रेल्वे प्रशासनास विनंती करून रेल्वे पुल साफसफाई करून पायल्या टाकुन पाणी निकासी चा मार्ग तात्काळ मोकळा करून पाणी समस्या सोडविली.


कांद्री वार्ड क्र. ५ संताजी नगर नेताजी सुभाष चंद्र पुतळा परिसरात गुरूवार (दि.१७) जुन २०२१ च्या मध्यरात्री जोरदार पाऊस येऊन रामटेक रेल्वे लाईन पुलातुन पावसाचे पाणी निकासी न झाल्याने संपुर्ण परिसरात पाणी साचुन जलमय झाल्याने काही घरात पाणी शिरल्याने (दि.१८) जुन २०२१ ला पहाटे ५ वाजता स्थानिय ग्रा प वार्ड सदस्य चंद्रशेखर बावन कुळे, राहुल टेकाम, अरुणाताई हजारे यांनी सरंपच मा. बळवंत पडोळे यांना सकाळी बोलावुन परिसर पाहुन पाणी निकासी मार्ग बंद झाल्याने सरपंच बळवं त पडोळे व सदस्य चंन्द्रशेखर बावनकुळे यांनी रेल्वे चौकी येथे प्रत्यक्ष जाऊन सुचना दिली व कर्मचा-यांना सोबत घेऊन आले असता रेल्वे कर्मचारी यांनी पुलाची पाहणी करुन भारतीय रेल्वे पथक कार्यालयाचा मा. वरिष्ठ अधिकारी यांना कळविले आणि सरपंच बलवंत पडोळे यांनी दुरध्वनी द्वारे चर्चा करुन तातडीने कामा स सुरवात करावी अशी विनंती केली. परंतु साचलेले पाणी काढणे गरजेचे असल्याने तातडीने डिझेल इंजि न लावुन पाणी रेल्वे लाईन पलीकडे फेकण्यात आले. ग्रा पं कांद्री येथील वार्ड क्र ५ च्या नागरिकांच्या घरात या नंतर पाणी शिरून नुकसान होऊ नये. यास्तव सर पंच बलवंत पडोळे, स्थानिय सदस्य व सदस्या यांनी पुढाकार घेत भारतीय रेल पथक कार्यालय कामठी येथील विरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा अति तातडीने रामटेक रेल्वे लाईन पुल नंबर २ ची साफ सफाई करू न नविन सिमेंट पायली टाकुन पाणी निकासी मार्ग मोकळा करून दिल्याबद्दल सर्व कामगार, कर्मचारी, भारतीय रेल्वे पथक कामठी तसेच ग्राम पंचायत सरपंच, सदस्य, कर्मचारी व कामगार यांच्या अथक प्रयत्नाने पाऊसा च्या पाण्यामुळे लोकांचे होणा-या नुकसानीची दखल घेत त्वरित पाणी निकासी समस्या सोडविण्यास सिंहा चा वाटा घेत तात्काळ समस्या सोडविल्या बद्दल कांद्री सरपंच बळवंत पडोळे, सदस्य चंन्द्रशेखर बावनकुळे, अरुणाताई हजारे, राहुल टेकाम , नरेश डांगरे, अतुल हजारे, विलास कवळे, राॅय सर व मान्यवर नागरिकांचे परिसराती नागरिकांनी मनस्वी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

केरडी रेल्वे उडाण पुलाचे डामरीकरण उखडुन अपघातास निमत्रंण

Mon Jun 21 , 2021
केरडी रेल्वे उडाण पुलाचे डामरीकरण उखडुन अपघातास निमत्रंण.  #) रेल्वेचा उडाण पुल झेड वळणाचा असल्याने अपघाताची शक्यता.  कन्हान : – नागपुर जबलपुर महामार्गावरील केरडी बस स्टाप पासुन केरडी, तेलनखेडी गावाला जाणा-या रस्त्यावर रामटेक रेल्वे लाईन च्या रेल्वे उडाण पुलाचे जागोजागी डाबरीकरण उखडुन उंचवटे व खोलगट रस्ता झाल्याने वाहन चालकांना जाता येता […]

You May Like

Archives

Categories

Meta