जुनीकामठी शिव मंदिरात महाशिवरात्री महोत्सव थाटात साजरा

जुनीकामठी शिव मंदिरात महाशिवरात्री महोत्सव थाटात साजरा

#) ” हर हर महादेव”, ” बंम बंम भोले” च्या जयघोषात पुजा , अर्चना संपन्न.

कन्हान : – शहरात व परिसरात महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु मागील दोन वर्षा पासुन कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने नाग रिकांनी घरीच पुजा अर्चना केली होती. परंतु या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने शासनाचे निर्बंध शिथील असल्याने जुनीकामठी पुरातन शिव मंदीरात सकाळ पासुन नागरिकांनी पुजा अर्चना व विविध कार्यक्रमाने महाशिवरात्री महोत्सव उत्साहाने थाटात साजरा कर ण्यात आला.
मंगळवार (दि.१) मार्च २०२२ ला महाशिवरात्री महोत्सव जुनीकामठी शिव मंदीरात सकाळी ४ वाजता विशेष यजमानांच्या हस्ते कामठेश्वर शिवालयाचे विद्वा न पंडित च्या हस्ते अभिषेक व सामुहिक आरती ने कार्यक्रमाची सुरूवात करित भजन कीर्तन कार्यक्रम करण्यात आला. महाशिवरात्री निमित्य परिसरातील नागरिकांनी जुनीकामठी कामठेश्वर मंदिरात शिव पिंड वर दुध, दही चा अभिषेक करून बेलबत्ती, पुष्प वाहुन पुजा अर्चना केली. गाडेघाट जुनीकामठी रोडवर कन्हा न-पिपरी दुर्गा माता मंदीर मित्र परिवार द्वारे महाशिव रात्री निमित्य नागरिकांना साबुदाना व फळ वाटप करण्यात आले. परिसरातील छोट्या मोठ्या शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्य भजन कीर्तन व विविध कार्यक्रमाने महाशिवरात्री महोत्सव उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.
सिद्धविनायक गणेश मंदिर पांधन रोड कन्हान

महाशिवरात्री निमित्य पांधन रोड स्थित सिद्ध विनायक गणेश मंदिरास फुलानी सजावट करण्यात आला. शिव मंदिरात पहाटे सकाळी शिव भोले व त्रिशुल चा अभिषेक, पुजा अर्चना करण्यात आली. याप्रसंगी शैलेश झेंडे, अमित थटेरे, राजा शंभोजी, मनीष वैद्य, गणेश चौधरी यांनी सहपत्नी सहभाग घेतला. समिती सचिव जगमोहन कपुर हयानी व्यवस्था साभाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सौ सुनिता मेश्राम यांना न्यायालयाचा दिलासा, सरपंच पद्दी आरूढ होण्याचा मार्ग मोकळा

Thu Mar 3 , 2022
सौ सुनिता मेश्राम यांना न्यायालयाचा दिलासा, सरपंच पद्दी आरूढ होण्याचा मार्ग मोकळा कन्हान : – नागपूर विभागाचे अप्पर आयुक्त यांनी अपात्र ठरविलेल्या टेकाडी (को ख) ग्राम पंचायतच्या सरपंचा सुनिता मेश्राम यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून पुन्हा सौ सुनीता मेश्राम या सरपंचपदी आरूढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पारशिवनी तालुक्यातील […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta