६४ व्या धम्मचक्र प्रवर्तण दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्य भिक्षु संघाच्या उपस्थितीत विशेष बुध्द वंदना व धम्मदेसनाचा कार्यक्रम संपन्न

६४ व्या धम्मचक्र प्रवर्तण दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्य भिक्षु संघाच्या उपस्थितीत विशेष बुध्द वंदना व धम्मदेसनाचा कार्यक्रम संपन्न .

• जाती – धर्माची राजनीती सोडून समता व मानव कल्याणकारी असणा – या बौध्द धर्माला देशाने स्वीकारावे – मा.ना. राजेंद्र पाल गौतम

• कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या ३८ व्या स्मृती दिनानिमित्त विविध संस्थेमार्फत अभिवादन करण्यात आले .

कामठी : १४ ऑक्टोबर १ ९ ५६ साली पवीत्र दिक्षाभुमी नागपूर येथे परमपुज्य डॉ . बाबासाहेब यांनी आपल्या कोटयवधी बांधवांसोबत बौध्द धम्माची दिक्षा घेतली . या दिनाचे महत्व लक्षात घेता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्य भिक्षु संघाच्या प्रमुख उपस्थितीत आज बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता विशेष बुध्द वंदना धम्मदेसनाचा कार्यक्रम करण्यात आले . या विशेष बुध्द वंदनेला दिल्ली प्रदेशचे सामाजिक न्याय मंत्री मा.ना.श्री राजेंद्र पाल गौतम , नागपूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रामुख्याने उपस्थित होते . या प्रसंगी माजी राज्यमंत्री व ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख मा. अँ। सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते पुज्य भिक्षु संघाला कठीन चिवरदान व भोजनदान देण्यात आल.
तत्पुर्वी दादासाहेब कुंभारे परिसरात असलेल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथील परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजश्री थाटात बसलेल्या पुर्णाकृती पुतळयाला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण करून परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
आमच्या देशात आज भीती व कौध चे वातावरण निर्माण झालेले आहे . आमच्या देशात जेव्हा जाती व धर्माच्या नावावर अत्याचार व हिंसा होणा – या घटनांनी संपूर्ण जगात आमच्या देशाचे नाव खराब होते , आम्हाला आत्ता सुरू असलेल्या जाती धर्माच्या राजनीती वरून वर उठून समता व मानवकल्याकारी असणा – या बौध्द धर्माचा मार्ग स्विकारण्याची आवश्यकता आहे . शांती , अहिंसा , व मानवकल्याणकारी मार्गाला स्विकारावे अशी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सर्वांनी घेतला पाहीजे. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे येतून मी खुप आनंदीत झालो आहे . मला सुध्दा अँड. सुलेखाताई कुंभारे द्वारे केलेल्या बौध्द धम्माच्या प्रसार व प्रचाराला पाहून भवीष्यात दिल्ली मध्ये १० करोड जनतेला धम्मदीक्षा कार्यक्रम घेण्याचा संकल्प आहे . असे उद्गार दिल्ली प्रदेशचे सामाजिक न्याय मंत्री मा.ना. श्री . राजेंद्र पाल गौतम यांनी या वेळी व्यक्त केले .

कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या ३८ व्या स्मृती दिनानिमित्त विविध संघनेतर्फे श्रध्दांजली .

कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या ३८ व्या स्मृती दिनानिमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमेला
अँड.सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली . तसेच ओगावा सोसायटी , डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र , हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था , ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन केंद्र , ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल , महाराष्ट्र राज्य बिडी मजदुर संघ , दादासाहेब कुंभारे बिडी उत्पादक सहकारी संस्था , जय भारत पत संस्था , दादासाहेब कुंभारे बहुउद्देशिय प्रशिक्षण केंद्र , दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी , हरदास विद्यालय , ईत्यादी संस्थेच्या वतीने सुध्दा या प्रसंगी कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली . ओगावा सोसायटीच्या वतीने ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात नुतनीकरणाचे काम करण्या – या १०० कामगारांना अन्न धान्याच्या किटचे वाटप व प्रत्येकी १० मास्क अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते वितरीत करण्यात येईल . तसेच हरदास विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकाचे सुध्दा वाटप करण्यात आले . या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सदर कार्यक्रम संस्थेचे पदाधिकारी व कर्मचा – यांच्या उपस्थितीत संपन्न झाले .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

टेकाडी (को ख)ग्राम पंचायत येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

Wed Oct 14 , 2020
*टेकाडी (को ख)ग्राम पंचायत येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न* पाराशिवनी(ता प्र) :- पाराशिवनी तालुकातिल टेकाडी (को ख)ग्राम पंचायत येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून ग्रां पं कार्यालयात टेकाडी(को ख) सरपंच च्या वतीने धम्मवंदना ने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण मानव जातीला विकासाच्या मुख्य प्रवाहात व […]

You May Like

Archives

Categories

Meta