सेंट्रल बँकेच्या एटीएम मधुन ९७,७४६ रू काढुन चोरी

सेंट्रल बँकेच्या एटीएम मधुन ९७,७४६ रू काढुन चोरी

#) कन्हान पोस्टे ला खाते धारक कामडे च्या तक्रारीने अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस एक कि मी अंतरावर असलेल्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया एटीएम मधुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने ९७,७४६ रूपये काढल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी च्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार श्रीराम देवराव कांमडे यांचे सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा कन्हान येथे बँक खाते क्र २३५३५४७८२३ चे बचत खाते असुन १० वर्षापासुन बॅंकेत व्यवहार सुरु आहे. शुक्रवार (दि.४) मार्च २०२२ ला बॅंकेत किसान क्राप्ट लोनचे पैसे भरण्याकरिता गेले असता पासबुक प्रिंट केली तर श्रीराम कांमडे यांचे बँक खाते नं. २३५३५४७८२३ मधील (दि.३१) डिसेंबर २०२१ ते मंगळवार (दि.१) मार्च २०२२ पर्यंत १८ वेळा एटीएम मधुन पैसे काढ ल्याचे दिसुन आले. एकंदरित कोणीतरी अज्ञात आरोपीने ९७,७४६ रुपये काढल्याने कन्हान पोलीसां नी फिर्यादी श्रीराम देवराव कांबड यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्ग दर्शनात कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रा.से.यो श्रमसंस्कार शिबिराचे येसंबा येथे उद्घाटन

Thu Mar 24 , 2022
रा.से.यो श्रमसंस्कार शिबिराचे येसंबा येथे उद्घाटन कन्हान : – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपुर संलग्नित श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्ट्स सालवा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे (दि.२१) मार्च ते २७ मार्च २०२२ या सात दिवसीय निवासी शिबिराचे येसंबा ता. मौदा या गावी उद्घाटन महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी […]

You May Like

Archives

Categories

Meta