वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेश व पदाधिका-यांची नियुक्ती
कन्हान : – वंचित बहुजन आघाडी कन्हान व्दारे साई नगरी गहुहिवरा रोड कन्हान येथे वरिष्ठ पदाधिका-यां च्या उपस्थित कार्यकर्त्यानी पक्ष प्रेवश करण्यात आला . तसेच मान्यवरांनी वंचित बहुजन आघाडी पारशिवनी तालुका व कन्हान शहर पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली.
शुक्रवार (दि.१७) ला सायं. ७ वाजता साई नगरी गहुहिवरा रोड कन्हान येथे वंचित बहुजन आघाडी व्दारे जिल्हा अध्यक्ष विलास भाऊ वाटकर, पूर्व विदर्भ संयोजक भागवनजी भोंडे, जिल्हा महासचिव प्रशांत भाऊ नगरकर, जिल्हाप्रवक्ता कल्याण अडकणे,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले, तालुका महासचिव बंटी भाऊ गजभिये, तालुका महासचिव विकास भाऊ आपुरकर, तालुका सचिव छन्नुजी राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थित अँड बाळासाहेब आंबेडकर व रेखा ताई ठाकूर यांच्या विचारावर विश्वास ठेवीत शैलेश ढोके, नितीन खोब्रागडे, प्रविण बावनकुळे, जतिन गजगये, महेश शेंडे, शशांक शेंडे, स्वप्नील नितनवरे, राहुल परदेशी, अमोल वालदे, शाहिल रंगारी, विकास जामगडे, कृष्णां भाजीपाले, अनमोल सुखदेव, नितेश लांजेवार, राहुल बेलेकर, शिबु मसराम, रोशन गजभिये, विवेक मेश्राम आदी अनेक कार्यकर्त्यानी पक्ष प्रवेश केला. तसेच वंचित बहुजन आघाडी पारशिवनी तालुका महासचिव पद्दी रजनीश वामन मेश्राम, पारशिवनी तालुका उपाध्यक्ष सोनु खोब्रागडे, कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम, शहर संघटक नितीन मेश्राम आदी पदा धिकारी यांची नियुक्ती करून घोषित करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले यांनी तर आभार कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम यांनी व्यकत केले.