घाटंजी : आंबेझरी कोच्ची धरणातील पाणी पूर्णपणे भरल्यामुळे आंबेझरी ते आसोली पांदण रस्त्यावरील नाल्याच्या वरून 6 फूट पाणी वाहत आहे त्यामुळे आंबेझरी येथील शेतकरी पूर्ण पने हतबल झाले होते, 35 ते 40 शेतकऱ्यांच्या कुटुंबाची शेती बुडण्याची वेळ येऊ नये करिता VJNT सेल चे जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, बंजारा टायगर्सचे शहर अध्यक्ष संजय आडे, यांच्या पुढाकाराने आज दिनांक 16/9/21 रोजी अधीक्षक अभियंता पाटबंधारे प्रकल्प मंडळ यवतमाळ यांना भेटून प्रकरण ताबडतोब निकाली लावावे अन्यथा त्याच पाण्यात जलसमाधी घेऊ असे निवेदन देण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीक्षक साहेबानी ताबतोब धरणातील पाणी सोडण्याचे आदेश दिले व समोर चालून त्वरित पूलाचे बांधकाम करून देण्याचे आस्वासन दिले, या प्रसंगी VJNT सेल चे जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, राष्ट्रीय बंजारा टाईजर्स चे शहर अध्यक्ष संजय आडे,आंबेझरी येथील सरपंच निळू राठोड,सदस्य राजू राठोड,कृष्णा राठोड,दिनकर चव्हाण,बंधू राठोड,मोहन हरी जाधव,दीपक जाधव,भावराव राठोड,विलास राठोड, नंदू चव्हाण, बंडू जाधव,देविदास चव्हाण,बादल राठोड व आंबेझरी येथील गावकरी मंडळी उपस्थित होते.
Next Post
घरगुती व सार्वजनिक गणपतीचे काली मंदिर नदी काठावर विसर्जन करावे - करूणाताई आष्टनकर
Sun Sep 19 , 2021
घरगुती व सार्वजनिक गणपतीचे काली मंदिर नदी काठावर विसर्जन करावे – करूणाताई आष्टनकर #) काली मंदिर कन्हान नदी पात्रात ढिवर समाज संघटनच्या पथका व्दारे श्री गणेश मुर्ती विसर्जन. कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात गणेश महोत्स व मोठया जल्लोषात साजरा करण्यात येतो. परंतु राज्या सह नागपुर जिल्ह्यात व ग्रामीण भागात मागील दोन वर्षापासुन […]

You May Like
-
October 8, 2020
कन्हान परिसरात नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा : कोरोना अपडेट
-
September 24, 2021
आमदारांचे आश्वासन हवेत तर पोलीस निरीक्षकांची कारवाई फजा : जनतेची ओरड
-
October 9, 2020
कन्हान परिसरात कांद्रीचा नविन एकच रूग्ण आढळल्याने दिलासा
-
April 2, 2023
आंबेडकर चौक,कन्हान येथे मा.शरद पवार यांचे जोरदार स्वागत