डोळयाचा दवाखाना व चश्म्याच्या दुकानास आग लागुन राख रागोंळी.

कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महा मार्ग कन्हान शहरातील डोळ्याचा दवाखाना व चश्म्या च्या दुकानास रात्री अचानक आग लागुन अग्निशमन बंब गाडी येई पर्यंत डोळे तपासणी यंत्रे, चश्मे व फर्निचर आगीने जळुन राखरांगोळी झाल्याने अंदाजे आठ ते नऊ लाखाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.
सोमवार (दि.१६) नोव्हेंबर ला ११.३० वाजता मध्यरात्रीच्या सुमारास नागपुर जबलपुर राष्ट्रीय चार पदरी महामार्गावरीव कन्हान शहरातील विजय मॉर्केट येथील डॉ नागपाल यांच्या डोळ्याचा दवाखाना व चश्म्याच्या दुकान ते नेहमी प्रमाणे बंद करून कामठी ला घरी गेल्यावर रात्री अचानक दुकानास आत मध्ये आग लागुन छतातुन धुवा व आग बाहेर निघत अस ल्याचे लोकांना दिसल्याने दुकानदारास व प्रशासनास माहीती देत आग विझविण्या करिता अग्निशमन बंब गाडी बोलावली परंतु वेकोलि कामठी कोळसा खदान आणि नगरपरिषद कामठी येथील अग्निशमन बंब गाडी येई पर्यंत डोळे तपासणी यंत्रे, चश्मे व फर्निचर आगीने जळुन राखरांगोळी झाली होती. दोन्ही अग्नि शमन बंबच्या मदतीने उशिरा रात्री आगीवर नियत्रंण मिळविल्याने आजु बाजुच्या दुकानास आगी पासुन वाचविण्यात आले. ही आग शॉटसक्रिट ने लागली असल्याचे बोलल्या जात असुन या आगीत डोळे तपासणी एक यंत्र किंमत पाच लाख, दुसरे यंत्र दिड लाख व चश्मे, फर्निचर असा अंदाजे आठ ते नऊ लाखाचे नुकसान झाल्याचे वर्तविण्यात येत आहे.