तेजस बहुउद्देशीय संस्थे व्दारे सेवानिवृत किशन अरगुलेवार चा सत्कार

तेजस बहुउद्देशीय संस्थे व्दारे सेवानिवृत किशन अरगुलेवार चा सत्कार

कन्हान : –  तेजस संस्थेचे सचिव किशन अरगुलेवार हे वेकोलि कोळसा खुली खदान कर्मचारी म्हणुन सेवानिवृत झाल्याने वेकोलि गोंडेगाव कार्यालयाच्या प्रांगणात तेजस संस्थे व्दारे मान्यवरांच्या हस्ते किशन अरगुलेवार हयांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

        तेजस बहुउद्देशीय संस्थेचे सचिव किशन अरगुले वार यांनी १८ वर्ष भारतीय सैन्य दलात सेवा केल्या नंतर २२ वर्ष वेकोलि कोळसा खुली खदान गोंडेगाव येथे सेवा देऊन (दि.१) जुलै २०२१ ला ६० वर्ष वय पुर्ण झाल्याने सेवानिवृत झाल्याने तेजस संस्थे व्दारे वेकोलि कोळसा खुली खदान गोंडेगाव कार्यालयांच्या प्रांगणात तेजस संस्था संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, मार्गदर्शक रहीम शेख, उपाध्यक्ष देविदास पेटारे हयांच्या हस्ते किशन अरगुलेवार हयांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी किशन अरगुलेवार यांनी मनोगतात तेजस संस्था स्थापने पासुन सचिव पदी असुन आपल्या नौकरी सोबतच संस्थेच्या सेवाभावी कामात सहभागी होऊन सेवा कार्य करित होतो. परंतु वेकोलि कोळसा खुली खदान गोंडेगाव येथील नौकरीतुन सेवानिवृत झाल्याने मी आपला पुर्ण वेळ संस्थेच्या सेवाभावी कार्यास देईल अशी इच्छा व्यकत केली. याप्रसंगी सहकारी दुर्गाप्रसाद पाली, सुफियान शेख, संस्था सदस्य कृपा अरगुलेवार, अमित गजले, सिमा गजले, तेजस अरगुलेवार, तेजस संस्था प्रशिक्षणार्थी नाजिम शेख, आकाश शेंडे, अभय पेटारे, सौरभ पात्रे, भारती  कनोजे, प्रणाली भारती, रजनी खंडारे, शीतल ठाकरे, मोनु शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

घरफोडी, चोरीच्या गुन्हयातील तीन आरोपीसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकास पकडले

Sun Jul 4 , 2021
घरफोडी, चोरीच्या गुन्हयातील तीन आरोपीसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकास पकडले #) स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीसांची कारवाई.  #) खोपडी (खेडी) येथील २ सिलेंडर सह इतर ९ गुन्हयातील १,३९,००० रू. चा मुद्देमाल जप्त.  कन्हान : – नागपुर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीस पथक नागपुर ग्रामिण […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta