लॉयन्स क्लब , सावनेर व्दारे अन्नदाता सुरक्षा अभियानाचा थाटात शुभारंभ

लॉयन्स क्लब , सावनेर व्दारे अन्नदाता सुरक्षा अभियानाचा थाटात शुभारंभ

सावनेर : शेतकरी बांधव पिकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक रासयनिक किटनाशक व तननाशकांचा उपयोग करतात . परंतु दरवर्षी अशी फवारणी करतांना निष्काळजीपणा केल्यामुळे अनेक शेतकरी शेतमजुरांना विषबाधा होते , प्रसंगी प्राण सुध्दा गमवावा लागतो . या गंभीर समस्येची जाणीव ठेवून लॉयन्स क्लव , सावनेर व्दारे ” अन्नदाता सुरक्षा अभियान ” ची सुरवात करण्यात आली .

सदर अभियानाचे उदघाटन कार्यकम नुकताच दिनांक 03.09 . 2021 रोजी हत्तीसरी गाम पंचायत परिसरात मोठ्या थाटात पार पडला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा . उपविभागीय अधिकारी श्री . अतुल म्हेत्रे साहेब होते . त्यांनी याप्रसंगी रासायणीक फवारणी करतांना निष्काळजीपणा करून जीव धोक्यात घालु नका असे समजावले . तसेच सर्व उपस्थीत लोकांना कोव्हीड लसीकरांचे महत्त्व पटवून दिले . लॉयन्स क्लब , सावनेर चे अध्यक्ष लॉ . अॅड . अभिषेक मुलमुले यांनी फवारणी करतांना रासायनाशी शरीराचा संपर्क होऊ नये यासाठी सुरक्षा सहित्य जसे मास्क , हातमोजे , चष्मा , इत्यादीचे वाटप करून महत्त्व पटवून दिले . तसेच चार्टड प्रेसीडेंट लॉ . वत्सल बांगरे यांनी किटकनाशकाचे रिकाम्या बाटल्या परत वापरू नका असे आव्हान कलेत . प्रसंगी उपाध्यक्ष लॉ . किशोर सावल यांनी मदर अभियान पुढे सुध्दा सुरू राहील अशी ग्वाही दिली . सेकेटरी लॉ . प्रा . विलास डोईफोडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना व सुत्रसंचलन केले . याप्रसंगी मौजा हत्तीसरी , कवठा , आष्टी , खैरी ( ढालगाव ) , जटामखोरा , बिडगांव येथील प्रत्यक्ष फवारणी करणार्‍या शेतकरी शेतमजूर बांधवांना लॉयन्स क्लब व्दारे रासयनिक किटनाशक तननाशक चा फवारणी करणारे शेतकरी बांधवांना लायन्स क्लब मार्फत ” संरक्षण किटस ” मोफत देण्यात आल्या तसेच “ सुरक्षा माहीती पत्रक ” सुध्दा वाटण्यात आलीत . कार्यकमास माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष श्री . मनोहरभाऊ कुंभारे , सौ अरूणाताई शिंदे सभापती पं.स. , श्री . प्रकाश पराते उपसभापती पं.स. , श्री . गोविंदराव ठाकरे हे मान्यवर प्रमुख्याने उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी अभियान प्रभारी लों . डॉ . अमीत बाहेती , लॉ डॉ . शिवम पुण्यानी , लॉ . अॅड . मनोजकुमार खंगारे , लॉ .डॉ . परेश झोपे , सरपंच सी . गिताताई बढीवे , श्री . सोनू रावसाहेब रेवेन्यू इंस्पेक्टर श्री . शरद नंदूरकर , कृषी सहाय्यक अधिकारी श्री . मानकर , सर्व लॉयन्स सदस्य व इतर गणमान्य अधिकारी सुध्दा प्रमुग्याने हजर होते . सदर अभियानाचे प्रभारी लॉ . डॉ . अमीत बाहेती यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि या अभियानास मोठया प्रमाणावर यशस्वी करण्याकरीता सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पाच युवकांचा नदीत बुडून मृत्यू

Sun Sep 5 , 2021
पाच युवकांचा नदीत बुडून मृत्यू कन्हान : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील गाडेघाट येथे १३ युवक दर्शनासाठी आले होते. यापैकी पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी उघडकीस आली. कन्हान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून युवकांचा शोध घेणे सुरू केले. मात्र, अद्याप एकही मृतदेह सापडलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या […]

You May Like

Archives

Categories

Meta