सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता कधी मिळणार?
शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पदरी निराशाच
कन्हान, ता. ६
राज्य : शासनातील इतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते मिळाले. मात्र, शिक्षकांनी निधी अभावा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळाली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे.
राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग फरकाची रक्कम रोखीने अदा करण्याचे आदेश आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय इतर पात्र अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना सातवा वेतन आयोग फरकाचा चौथा हप्ता जून महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करणेबाबत वित्त विभागांकडून २४ मे २०२३ रोजी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
परंतु निधी अभावी दुसरा-तिसरा हप्ताच मिळाला नाही. राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे पहिला, दुसरा, तिसरा हप्ता मिळालेला आहे. परंतु राज्यातील शिक्षक -शिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत शासन निर्णय निर्गमित होऊनही निधी अभावी दुसरा व तिसरा हप्ता मिळालेला नाही. यामुळे चौथा हप्ता प्रदान करणे बाबतच्या शासन निर्णयाचा काय फायदा ? असा सवाल शिक्षक-शिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.
राज्य शासनाने २४ मे २०२३ रोजी चौथा हप्ता अदा करणेबाबत निर्गमित केलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील केली आहे.शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे. हा शासन निर्णय काढून राज्य शासनाने शिक्षक संवर्गाची अवहेलना करण्यात आली आहे, असे शिक्षकांचे मत आहे. तरी राज्यातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना तत्काळ दुसरा, तिसरा व चौथा हप्ता देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज बोडे व सरचिटणीस वीरेंद्र वाघमारे यांनी
Post Views: 1,021
Thu Jun 15 , 2023
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.के.चंद्रशेखर राव यांचे नागपूरात आगमन भारत राष्ट्र समितीच्या विदर्भ कार्यालयाचे मुख्यमंत्री हस्ते उद्घाटन ठिकठिकाणी “अब की बार किसान सरकार”चा नाराची गुंज कामठी, ता.१४ भारत राष्ट्र समितीचा देशपातळीवर विस्तार होत आहे. महाराष्ट्र राज्यभरात सर्व शक्तिनिशी कार्य सुरू आहे. विदर्भात सर्वदूर पक्ष विस्तार करण्यासाठी नागपूर येथे भारत […]