घाटंजी येथे बंजारा समाजाचा तीज विसर्जन सोहळा उत्साहात साजरा

*घाटंजी येथे बंजारा समाजाचा तीज विसर्जन सोहळा उत्साहात साजरा*

घाटंजी :  श्री संत सेवालाल महाराज तांड्याचा तीज विसर्जन सोहळा जल्लोशात पार पडला. बंजारा समाजाच्या परंमपरे नुसार संत सेवालाल महाराज मंदिर येथे तांड्याचे नायक नामदेवराव आडे, कारभारी अरविंद जाधव, डाव बंडू जाधव व तांड्यातील मान्यवरांच्या उपस्थितित रक्षाबंधनच्या शुभ पर्वावर तीज पेरण्यात आले होते. अविवाहित मूली या तीजच्या अवती भवती नाचत, बंजारा गाने गात तीज वर पानी टाकून आणोदोस्तव साजरा केला. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण मूर्तिची स्तापना करुण पूजा अर्चना करुण ढमोळीचा कार्यक्रम पार पडला. तांड्यातील समस्त बंजारा बंधु भगिनी तीज तोड़न्याकरिता ऐकत्र जमले या प्रसंगी तांड्यातील सेवानिवृत मान्यवर सीताराम राठोड सर,अविनाश चव्हाण, डॉ. देवीदास राठोड, रमेश राठोड, व वसंत राठोड यांचे शाल व श्रीफळ देऊन सहपत्निक सत्कार करण्यात आले.गावातील मुख्य रस्त्याने डफड्याच्या तालावर नाचत मिरवनुक काढण्यात आलि स्व. वसंतराव नाईक चौक व गनराज वाडा चौकात अभिवादन करण्यात आले .

   यावेळी *राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहीर* यांनी रैलीत सहभाग नोंदऊन तीज तोडून समाज बांधवाना शुभेच्छा दिल्या. सायंकाळी ७.०० वास्ता वाघाडी नदिच्या पवित्र पात्रात श्रीकृष्ण मूर्तिचे व तीजचे विसर्जन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन पी. एस. राठोड सर यांनी केले तर आभार राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे शहर अध्यक्ष संजय आडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कुणाल बेले,  मेजर ध्यानचंद राष्ट्रीय खेल पुरस्कार से सम्मानित

Tue Sep 12 , 2023
*कुणाल बेले  मेजर ध्यानचंद राष्ट्रीय खेल पुरस्कार से सम्मानित* राष्ट्रीय खेल दिवस के उपलक्ष्य मे मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद नई दिल्ली द्बारा रत्नागिरी पुरस्कार वितरण समारोह का आयोजन किया था! विगत १३ वर्षो से स्केटिंग के माध्यम से सावनेर शहर के खिलाड़ियों को प्रशिक्षित कर राज्य, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta