राम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन  

राम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन

सावनेर : श्रीराम धर्माचे मूर्तिमंत स्वरूप आहे भारताचा आत्मा आहे . श्रीराम जन्मभूमीवर भव्य असे श्रीराम मंदिर असावे , ही भारतीय जनमानसाची शाश्वत प्रेरणा आहे हे केवळ मंदिर निर्माण नसून प्रत्येक भारतीयांच्या मनात श्रीराम आणि त्यांच्या जीवनमूल्यांची प्रतिष्ठा व्हावी , समाजातील प्रत्येक वर्गात परस्पर प्रेम बंधुत्व दृढ व्हावे आणि ज्या प्रमाणे सेतु बांधणी समयी खारीचा वाटा महत्त्वपूर्ण होता त्याप्रमाणे प्रत्येक भारतीयाचे यथाशक्ती योगदान या पावन कार्यात राहावे यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास द्वारे देशव्यापी श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान राबविल्या जात आहे . असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा . जयंत मुलमुले यांनी केले . ते पोटोडे कॉम्प्लेक्स गांधी चौक सावनेर येथे सावनेर नगर व तालुका कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते . हा उद्घाटन सोहळा सौ . रेखाताई मोवाडे नगराध्यक्ष न.प. सावनेर , आचार्य प्रशांत महाराज , नगरसेवक तुषार उमाटे , डॉ.नितीन पोटोडे , डॉ . विजय धोटे , नगर निधी संकलन समितीचे श्रीराम आवदे , अभिषेक गहरवार , मंदार मंगळे , लक्ष्मीकांत पोटोडे , नरेंद्र ठाकूर , अॅड . चंद्रकांत पिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सहसंयोजक कुलभुषण नवधिंगे यांनी आभार कार्यालय प्रमुख अॅड . मनोज खंगारे यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात

Sat Jan 16 , 2021
प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात* *पहिल्या चरणात आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी तर पुढील चरणात आंगनवाडी सेवीका,महसूल विभाग,इतर कर्मचारी व 50 वर्षापेक्षा जास्त असे प्राथमिक नियोजन* सावनेरः कोरोना महामारीवर उपायोजना म्हणून केन्द्र सरकार व राज्य शासनाने कोवीड़ 19 लसिकरणास  देशभरात लसीकरणास येत्या 16 जानेवारी पासुन सुरुवात झाली असून देशाचे […]

You May Like

Archives

Categories

Meta