ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे कोरोना दुताचा सत्कार करून ७५ वा स्वातंत्रदिन सोहळा थाटात साजरा

ग्रामोन्नती प्रतिष्ठान व्दारे कोरोना दुताचा सत्कार करून ७५ वा सोहळा थाटात


कन्हान : – ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व स्वामी विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट कन्हान व्दारे १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनी ध्वजारोहन व कोरोना दुताचा गु़णगौरव करित सत्कार करून ७५ वा स्वातंत्र दिन सोहळा थाटात साजरा करण्यात आला. 

       रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ ला सकाळी ९.३० वाजता ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व स्वामी विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट कन्हान चे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार मा प्रकाश भाऊ जाधव यांच्या प्रागंणात दखने हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक पोतदार सरां च्या हस्ते व सेवानिवृत्त शिक्षक देशमुख गुरूजी, पांडे सर, जेष्ट नागरिक विनायक वाघधरे आदीच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रमाता व महात्मा गांधी च्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहन करण्यात आले. मातोश्री भजन मंडळाच्या महिलांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन सादर करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. शासकीय रूग्णालय मेयो व मेडीकल नागपुर येथे कोरोना काळात मुत्यु पावलेल्या २०० मुतदेहाचा कामठी व कन्हान येथील स्मशान घाटावर अंतिम संस्कार करणारे कामठी येथील हाजी मोहम्मद हरशद यांचा श्री एकनाथजी खर्चे सरांच्या हस्ते तर हाफीज ईस्लाउद्दीन यांचा श्री पांडे सरांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.कन्हान शहरातील कोरोना मुत्युदेहाचा कन्हान नदीवर अंतिम संस्कार करणारे नगरपरिषद कन्हान येथील कर्मचारी लकेश माहातो चा नगरसेवक मनिष भिवगडे यांचे हस्ते, अनिल बरसे चा नगरसेविका गुंफाताई तिडके च्या हस्ते, पवन समुंद्रे चा नगरसेविका रेखा टोहणे, बंटी खेचर चा प्रमोद वानखेडे च्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. लॉक डाऊन लागताच इतर राज्यात स्वगृही परत पायदळ जाणा-या असंख्य मजुर व नागरिकांना कांद्री टोल नांक्या जवळ जेवण देणा-या चमु प्रमुख कृणाल संतापे यांचे ताराचंद निंबाळकर यांचे हस्ते तर मिलींद पापडकर यांचे खिमेश बढिये सरांच्या हस्ते, कोरोना काळात उत्तम कार्य करणारे नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांचे डॉ हुकुमचंद काठोके च्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच प्राथ. आरोग्य केंद्र कन्हान चे रूग्णवाहीका चालक गौरव भोयर व कार्यक्रमास उत्कृष्ठ रांगोळी काढणारी कु सांनिध्या बावणे चा ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मा. प्रकाश भाऊ जाधव हयानी स्वत: शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गुणगौरव करून सत्कार करण्यात आला.    

         देशाला स्वातंत्र मिळविण्यास प्राणाची आहुती देणा-या सर्व वीर जवाना च्या स्मृतीस अभिवादन  करून ७५ वा स्वातंत्रदिनाच्या उपस्थिताना शुभेच्छा देऊन, जिल्हयाची लाईफ लाईन कन्हान नदी प्रदुषणा च्या विळख्यात असल्याने कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून संवर्धनाच्या युध्दात सहभागी होण्याचे आवाहन ग्रामोन्नती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष व माजी खासदार मा प्रकाश भाऊ जाधव हयांनी केले. कार्यक्रमाच्या यश स्वितेकरिता ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान चे मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, गणेश भोंगाडे, कमलेश पांजरे, अजय ठाकरे, चंद्रशेखर कळमदार, रवी कोतपल्लीवार, कमलसिंग यादव, सुनिल सरोदे, रविंद्र चकोले, महेश काकडे, सचिन साळवी, गोविंद जुनघरे, प्रविण गोडे, प्रतिक जाधव, उमराव पाटील, शंकर राऊत, माधव काठोके, ऋृषभ बावनकर, आनंद सहारे, श्याम मस्के, निलेश गाढवे, राजेश गणोरकर, केतन भिवगडे, निशांत जाधव, प्रविण माने सह बहुसंख्येने प्रतिष्ठीत नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रोहित मानवटकर यांची राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा महासचिव पदावर नियुक्ती

Tue Aug 17 , 2021
* रोहित मानवतावादी सरकार महासचिव नवरात्र* कन्हान – राष्ट्रवादी पार्टी पारशिवनी तालुका मिडिया सेलवर, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता रोहित मानवतावादी कॉंग्रेस पार्टी, नागपुर ग्रामीण दल, शिवराज बाबा, मिडिया सेल मीडिया, अमर मोकाशी, नागपुर, महाराष्ट्र, मुंबई आली आहे. त्यांचे नवीन विकास अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्य अजितदादा पवार, प्रदेश श्री जयंतजी पाटील, राज्य […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta