खाजगी ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, तिघे ठार : आठ प्रवासी जखमी , पाटणसावंगी येथील घटना

सावनेर , : भरधाव खासगी बसने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे . तसेच आठ प्रवासी जखमी झाले . ही घटना नागपूर सावनेर महामार्गावर पाटणसावंगी उड्डाणपुलावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली . जखमींना नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे . रॉयल महाराजा कंपनीची खासगी बस ( क्रमांक एमपी ३० , पी ०६८२ ) नागपूर मार्गे बैतुलचे प्रवासी घेऊन रायपूरला निघाली होती तर आयसर ट्रक ( क्रमांक एमपी २८ , जी -६६६६ ) हा छिंदवाडा येथून लसणाची पोते घेऊन नागपूर येथील भाजीमार्केटमध्ये येत होता . गुरूवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास पाटणसावंगी उड्डाणपुलावर भरधाव खासगी बसने ट्रकच्या मागच्या बाजूने जोरदार घटक दिली यामध्ये टकच्या मागे बसलेले धनराज बळीराम चौरिया ( वय ६० , पारतलाई , ता.मोहखेड , जि . छिंदवाडा ) व शिवराम रामाधार चौरिया ( वय६५ , बामला , ता.मोहखेड , जि.छिंदवाडा ) खासगी बसचा चालक रवी मालविय ( वय ३१ ) यांचा मृत्यू झाला . तसेच गोलू इकबाल मेवासी ( वय २४ , रा . भोपाळ ) , सलमान सलीम शेख ( वय २३ , भोपाळ ) , देवेंद्र शाहू ( वय २३ , रा भोपाळ ) , शबिया फिरोज शेख ( वय २५ , मानकापूर , नागपूर ) , रामबाबू फहिरवर , ( वय २ ९ , ओरिसा ) , आसू रोहिकार ( वय २४ , जयताळा , नागपूर ) , अनुराग प्रेमसिंग यादव ( वय २७ , इंदोर ) , संदीपकुमार मोहन शाहू ( वय २ ९ , ओरिसा ) हे जखमी झाले . अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन पसार झाला . घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले . मृतदेह सावनेर येथील शवागृहात तर जखमींना मेयो हॉस्पिटल नागपूर येथे पाठविण्यात आले .


अपघातामुळे उड्डाणपुलावरील एकतर्फी वाहतूक विस्कळीत झाली होती . पोलिस व एनएचएआयच्या चमूने अपघातग्रस्त दोन्ही वाहनांना बाजूला करून मार्ग मोकळा केला . याप्रकरणी सावनेर पोलिसांनी खासगी बसचालकावर गुन्हा दाखल केला . पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर , संदीप नागरे , हेमराज कोल्हे , कृष्णा जुनघरे तपास करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक

Fri Mar 19 , 2021
विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक सावनेर  : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे . नातेसंबंधामुळे आरोपी घरी पाहुणा म्हणून मुक्कामी आला होता . नवनाथ शिवनाथ उर्फ शिवाजी सावंत ( वय २२ , अमडापूर , […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta