विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक

विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक

सावनेर  : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे . नातेसंबंधामुळे आरोपी घरी पाहुणा म्हणून मुक्कामी आला होता . नवनाथ शिवनाथ उर्फ शिवाजी सावंत ( वय २२ , अमडापूर , तालुका वरुड ) असे आरोपीचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार पत्नीच्या घरी पाहुणा म्हणून मुक्कामी आलेल्या आरोपीने पीडित ही घरात झोपेत असताना तिच्याकडे जाऊन तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि तुझ्या बहिणीसारखेच तुलाही ठेवायचे आहे . तुझे दुसरीकडे कुठेही लग्न होऊ देणार नाही असे धमकावून पीडितेचा विनयभंग केला . यावेळी पीडितेने आरडाओरड केल्यामुळे घरातील झोपी गेलेली मंडळी जागी झाली व आरोपीला घरून हाकलून लावले . तेव्हा आरोपीने जाताना शिवीगाळ केली व झाला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान, साटक ला २५५ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा घेतला लाभ   

Sat Mar 20 , 2021
कन्हान, साटक ला २५५ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा घेतला लाभ    #) प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान १४५ व साटक ११० अश्या २५५ नागरिकांना लस चा लाभ.  कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यकतीना कोरोना लस १४५ तर प्राथ. आरोग्य केंद्र साटक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta