स्वामी विवेकानंद यांना दिली श्रद्धांजलि

*स्वामी विवेकानंद यांना दिली श्रद्धांजलि*

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे करुन स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व श्रद्धांजलि अर्पित करून स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .


रविवार दिनांक ४ जुलै २०२१ ला कन्हान शहर विकास मंच द्वारे स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे करण्यात आले असुन मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता मंच सचिव प्रदीप बावने महासचिव संजय रंगारी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवना वर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन दोन मिनटाचा मौन धारण करुन भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करून स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , कार्यकारी संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण , प्रवीण माने , जीवन ठवकर , वैशाली खंडार , पौर्णिमा दुबे , प्रकाश कुर्वे , अखिलेश मेश्राम , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण

Mon Jul 5 , 2021
गौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण कामठी -प्रभाग 15 तील गौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्या करिता परिसरातील नागरिकांनी ग्रिन जिम चा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका संध्या रायबोले यांनी केले […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta