टेकाडी शिवारात एका इसमाने गळफास लावुन केली आत्महत्या

टेकाडी शिवारात एका इसमाने गळफास लावुन केली आत्महत्या

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवारात शेतातील झाडाला दुपट्याने गळफास लावुन रविंद्र पोटभरे इसमाने आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

 
प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.१२) जानेवारी २०२२ ला सायंकाळी ५ वाजता दरम्यान मृतक रवींद्र रामलाल पोटभरे वय ३६ वर्ष हल्ली मुक्काम वैशाली नगर बिनाकी मंगळवारी नागपुर याने कांद्री येथे राह. आपल्या भावाला फोन करून येत असल्याची माहिती दिली. मात्र रात्रीचे साडे दहा वाजता पर्यंत रवींद्र पोटभरे घरी न पोहोचल्याने भावाने मृतक रवींद्र याला फोन करून “तु कुठे आहे” विचारले असता तर घरी येत आहे असे सांगितले परंतु रात्री उशीरा पर्यंत घरी पोहोचला नाही. दुसऱ्या दिवशी गुरुवार (दि.१३) जानेवारी २०२२ ला सकाळी ११ ते १२ वाजता दरम्यान काही शेतकरी शेतात जात असतांना त्याना टेकाडी शिवारात व्हाईट लॉज च्या मागे मृतक रवींद्र रामलाल पोटभरे हा शेतातील बोराच्या झाडाला दुपट्टयाने गळ फास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आल्याने त्यांनी माहिती मृतकाचा कांद्री येथील लहान भाऊ अरविंद रामलाल पोटभरे व नातेवाईकांना दिली असता नातेवाईकांनी घटनास्थळी पोहचुन सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली असता कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नरेश वरखडे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून शवविच्छेदना करिता कामठी ग्रामिण रुग्णालय पाठविले. कन्हान पोलीसांनी लहान भाऊ अरविंद पोटभरे यांच्या फिर्यादी ने मर्ग क्र ३/ २०२२ कलम १७४ जा फौ अन्वये नोंद करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश वरखडे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ०४ व साटक ०२ असे ०६ कोरोना संक्रमित रूग्ण : कोरोना अपडेट

Sat Jan 15 , 2022
कन्हान ०४ व साटक ०२ असे ०६ कोरोना संक्रमित रूग्ण #) तिस-या लाटेची चाहुल ७० कोरोना रूग्ण होम कोरंटाईन असुन कन्हान परिसराची एकुण ८५ रूग्ण. कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या २६ तपासणी कन्हान ०४ व प्राथमिक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta