प्राथमिक आरोग्य केंद्रात शहर विकास मंच द्वारे ध्वजारोहण

कन्हान,ता.२७ जानेवारी
कन्हान शहर विकास मंच द्वारे ७४ व्या प्रजासत्ताक प्राथमिक आरोग्य केंन्द्र परिसरात ध्वजारोहण आणि आदर्श हायस्कुल ला नेताजी सुभाष चंद्रबोस यांची प्रतिमा भेट देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गुरुवार (दि.२६) जानेवारी ७४ वा प्रजासत्ताक दिवस निमित्य शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोरील ग्रीन जीम परिसरात करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.शंशाक राठोड, प्रमुख अतिथि क्राईम पोलीस निरीक्षक मा.यशवंत कदम, सौ.डॉ. तेजस्वीनी गोतमारे, सौ.डॉ.नाझरा मॅडम, संस्थेचे वरिष्ठ मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, ताराचंद निंबाळकर यांच्या हस्ते भारत मातेच्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजारोहण करुन तिरंगा झेंडा ला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी डॉ.शंशाक राठोड, पोलीस निरीक्षक यशवंत कदम यांनी प्रजासत्ताक दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी व सदस्यांनी मंच अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आदर्श हायस्कुल शाळेला प्रजासत्ताक दिना निमित्य नेताजी सुभाष चंद्र बोस यांची प्रतिमा भेट करुन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
प्रसंगी अंगणवाडी सेविका कौशल्या गणोरकर, सारिका धारगावे प्रीति वाघमारे, प्रमिला घोडेस्वार, वंदना शेंडे, वर्षा उरकुडे, माला कांबडे, वैशाली ठाकरे, माला थूटे, रंजना गनोरकर, वैशाली बोरकर, नालिनी साकोरे, बर्वे ताई, मनघटे ताई, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार, गौरव भोयर, वैभव थोरात, संजय तिवसकर सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव प्रणय बावनकुळे, सहसचिव प्रकाश कुर्वे, कोषाध्यक्ष भुषण खंते, सुरज वरखडे, योगराज आकरे, हरीओम प्रकाश नारायण, शाहरुख खान, हर्षल नेवारे, शुभम नागमोते, स्वप्निल वरखेडे, सह आदि ने सहकार्य केले .
Post Views:
85
Sat Jan 28 , 2023
७४ प्रजासत्ताक दिनी मानव अधिकार संरक्षण संघटन केले रक्तदान भव्य रक्तदान शिबिरात ३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान कन्हान,ता.२७ जानेवारी मानव अधिकार संरक्षण संघटन पारशिवनी तालुका अध्यक्ष पंकज रामटेके मित्र परिवार द्वारे ७४ वा प्रजासत्ताक दिना निमित्य तारसा रोड, गहुहिवरा चौक, कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]