पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिवसी रक्तदान शिबीराने सेवासप्ताह सुरू
#) भाजपा, भाजयुमो व्दारे ग्राम स्वच्छता व वृक्षरोपनाचे सेवाकार्य.
कन्हान : – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवसी सेवासप्ताहाची रक्त दान शिबीराने सुरूवात करून ग्रामस्वच्छता, वृक्षरोपन आदी सेवा कार्याने भाजपा, भाजयुमो पारशिवनी तालुका, कांद्री-टेकाडी जि प सर्कल व शहर व्दारे सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या आदेशाने भाजपा पारशिवनी तालुका व कांद्री-टेकाडी जि प सर्कल भाजपा, भाजयुमो व्दारे प्रदेश कार्यकारणी सदस्य डी.मल्लिकार्जुन रेड्डी व भाजपा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या मार्गदर्शनात देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीं यांच्या ७० व्या वाढदिवसी हनुमान मंदिर कांद्री येथे रक्त दान शिबीराने सेवासप्ताहाची सुरूवात करून दुस-या दिवसी हनुमान मंदीर परिसर, गांधी चौक व परिसरात “गाव स्वच्छता अभियान तसेच तिस-या दिवसी वृक्षारोपन सेवा कार्याने सेवासप्ताहा साजरा करण्यात येत आहे.
याप्रसंगी भाजपा म हा.कार्य.सदस्य माजी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी, भाजपा जि.ग्रा मंत्री जयराम मेहरकुळे, भाजपा तालुकाध्यक्ष अतुल भाऊ हजारे, जि.प.सदस्य वेंकटेश कारेमोरे,आमिष रुंघे, शिवाजी चकोले, भुषण इंगोले, नरेश पोटभरे, सुरेंद्र बुधे, राजेश पोटभरे, गुरुदेव चकोले, राहुल वंजारी, शेखर गिऱ्हे, राजहंस वंजारी, सौरभ पोटभरे, विनोद कोहळे, लोकेश अंबाडकर, प्रतिक वैद्य, नरेश मेश्राम, मनोज गिरी, गुरुदेव चकोले, सुनील लाडेकर, मोंटु सिंह, अनिल उके, प्रशांत देशमुख, धर्मेंद्र शुक्ला, आशिष बुरसे, प्रफुल हजारे, अमन घोडेस्वार, उमेश लोणारे, रोहित चकोले, नितेश कांबळे, सेवकराम भोंदे, गणेश किरपान, प्रविण आखरे, प्रदीप आखरे, रवींद्र कांबळे, वासुदेव आखरे, प्रयाग पोटभरे, भोला मंडळेकर, प्रल्हाद तेलोते, सुभाष कापसे, प्रविण हिंगे, माकेलाल गुप्ता सह गावकरी नागरिक उपस्थित होते.