कन्हान परिसरात जागतिक महिला दिन थाटात साजरा

कन्हान परिसरात जागतिक महिला दिन थाटात साजरा

कन्हान : – परिसरात ८ मार्च जागतिक महिला दिन विविध सामाजिक, राजकिय व इतर संस्थे व्दारे विविध कार्यक्रमाचे आयोजनाने महिलेचा सत्कार, सन्मान करून महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला.

शहर महिला काँग्रेस कमेटी व राष्ट्रीय कोयला खदान मजदुर युनियन

मंगळवार (दि.८) मार्च २०२२ ला जागतिक महिला दिना निमित्त कन्हान शहर महिला काँग्रेस कमेटी व राष्ट्रीय कोयला खदान मजदुर युनियन (इंटक ) तसेच विनय यादव मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमा ने हनुमान नगर पाणी टाकी परिसरात श्रम कार्ड, वोटिं ग कार्ड, हेल्थ कार्ड तसेच शरीराच्या हाडाची तपासणी निशुल्क शिबीराचे आयोजन करून जागतिक महिला दिन थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रम कन्हान शहर महिला काँग्रेस कमेटी अध्यक्षा सौ. रिताताई नरेश बर्वे यांचे अध्यक्षेत व प्रमु ख पाहुणे इंटक नेते मा. एस क्यु जमा, प्रेमलता दीदी, डॉ.उमा शर्मा, इंटक नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे, इंटक नेत्री अंजु सिंग, फरद सिद्दीकी, सलमा खान आदी च्या प्रमुख उपस्थित नारी शक्तीला नमन व दिप प्रज्वलित करून श्रम कार्ड, वोटिंग कार्ड, हेल्थ कार्ड तसेच शरीराच्या हाडाची तपासणी निशुल्क शिबीरा ची सुरूवात करण्यात आली. या निशुल्क शिबिराचा परिसरातील महिलांनी लाभ घेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय यादव यानी करून सुत्रसंचालन सौ. प्रणाली योगेंद्र रंगारी हयानी तर आभार सौ. गौतमी गजभिये यांनी व्यकत केले. याप्रसंगी नगरसेविका सौ. गुंफाताई तिडके, कल्पना नितनवरे, कु. रेखा टोहने, पुष्पा कावड कर, नगरसेवक योगेंद्र (बाबु) रंगारी, मनिष भिवगडे, विनय यादव, पप्पु जमा प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अबरार सिद्दीकी, शेखर बोरकर, अमोल प्रसाद, स्वप्नील मते, शरद वाटकर, आकाश महातो, वीरेंद्र सिंग, तालिब सिद्दीकी, नदीम जमा, आकाश रहिले, शिवाजी, विनोद पाली, कमलेश गोसावी, रामप्रताप सिंग, राजपुत, विजय तिवारी, रोहित माहुल, गौतम रंगारी, प्रशांत मसार, चंदन मेश्राम , दिपक तिवाडे, छाया रंग, सुनिता मानकर, मीना वाटकर, सुवर्णा शिंदे, कुंदा रंगारी, अश्विनी वाघमारे, रंजनी अहिर, वैजयंती अंबादे, उर्मिला तिरपुडे, शुभांगी खुरपुढे, सुनंदा ढोले, राधा चौहान, जयवंती जामगडे, प्रमिला रंगारी, शोभा मेश्राम, सत्यफुला मेश्राम, लता रोकडे, कमल रामटेके, इंदु नागपुरे, हिराबाई चकोले, वनिता काळे, भाग्यवंती भेलावे आदीने सहकार्य केले. शिबीरास बहु संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दुबालेजी महाराष्ट्र शासन गृह विभाग निराकरण समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात महिलांचा सत्कार करून जागतिक महिला दिन थाटात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे पारशिवनी तालुक्याच्या वतीने सुध्दा कन्हान पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा परमात्मा एक दांडपट्टाच्या मुलीनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. तदंतर सेंट्रल बँक कन्हान येथे संपूर्ण महिला कर्मचारी असुन बँकेचा कार्यभार सांभाळत असल्याने त्यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित आणि कौतुक करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता समाजसेवक निलेश गाढवे अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी तालुका, समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी, दांडपट्टा वस्ताद मोहन वकलकर उपाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी, केतन भिवगडे अध्यक्ष राजे ग्रुप कन्हान, अभिजीत चांदुरकर, रितेश जनबंधु , सेजल बावणे, साशी सुर्यवंशी, उर्वशी मल्लेवार, बुलबुल वकलकर, अल्केश वाकलकर आदीने सहकार्य केले.

मनुष्य जीवनात में महिलेचे महत्वपुर्ण योगदान- त्रिवेदी

ईश्वराने सृष्टी निर्माण करताना महिलेची निर्मिती भरपुर विचारपुर्वक केली. महिला ही एक सुखी व समृद्ध परिवारा करिता महत्वपुर्ण योगदान करित असते. असे गौरव उदगार वेकोलि गोंडेगांव उपक्षेत्रीय प्रबंधक तरूण कुमार त्रिवेदी यांनी वेकोलि जे.एन. चिकित्सालय येथे आयोजित कार्यक्रमात केले.


वेकोलि जवारहलाल नेहरू चिकित्सालय कांद्री, झंकार महिला मंडल नागपुर आणि होप दवाखाना यांच्या सयुक्त विद्यमाने जवाहरलाल नेहरू दवाखाना कांद्री येथे जागतिक महिला दिवसा निमित्य महिला करिता बोन डेंसिटी कैम्प चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम वेकोलि गोंडेगांव उपक्षेत्रीय अधिकारी तरूण कुमार त्रिवेदी यांचे अध्यक्षेत व प्रमुख अतिथी कामठी उपक्षेत्रीय प्रबंधक विनय कुमार, जे.एन.दवाखाना वैद्यकीय अधिकारी एच.पी. गुप्ता, कार्मिक प्रबंधक मनोजकुमार त्रिपाठी, उपमुख्य कार्मिक प्रबंधक राजेश यादव, होप दवाखाना नागपुर चे डॉ. मुरली, डॉ. आलिया आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी त्रिवेदी यांनी संबोधित केले की, प्रत्येक मनुष्या च्या जीवनात महिलेचे महत्वपुर्ण योगदान असते. मनुष्या च्या बालपणा पासुन तर अंतिम अवस्थे पर्यंत मनुष्या च्या प्रगती मध्ये महिला ही महत्वपुर्ण भुमिका पार पाडत असते. त्यानी वेकोलि आणि ग्रामीण भागात कार्यरत महिला च्या कार्या ची प्रशंशा केली. कार्यक्रमा चे संचालन व आभार प्रदर्शन वेकोलि गोंडेगांव उपक्षेत्र कार्मिक प्रबंध अतुल बंसोड यांनी केले. शिबीरात ११२ महिलांची बोन डेंसिटी तपासणी करून निशुल्क औषधी देण्यात आल्या. अल्पोहार वितरित करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता वेकोलि जे एन दवाखाना कांद्री च्या सर्व अधिकारी व कर्मचा-यानी सहकार्य केले.

ग्राम पंचायत येसंबा (सालवा)

मंगळवार (दि.८) मार्च २०२२ ला ग्राम पंचायत येसंबा आणि सर्व स्वयं सहाय्यता महिला बचत गट येसंबा यांच्या सयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रम सौ. वनिताताई चकोले यांचे अध्यक्षेत व प्रमुख पाहुणे सरपंच श्री.धनराजजी हारोडे, विशेष अतिथी श्री. चव्हाण साहेब, आय.सी.आर.पी. हिरा चकोले, अंगणवाडी सेविका माया चकोले, ग्राम संघा च्या अध्यक्षा सारिका राऊत, ग्राम संघाच्या सचिव अरूणा बांगडे यांच्या प्रमुख उपस्थित जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास सर्व स्वयं सहाय्यता बचत गटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला महिला दिवसी विविध कार्यात कार्य करणाऱ्या महिलांचा व युवतींचा सत्कार

Thu Mar 10 , 2022
कन्हान ला महिला दिवसी विविध कार्यात कार्य करणाऱ्या महिलांचा व युवतींचा सत्कार #) कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन. कन्हान : – शहर विकास मंच द्वारे जागतिक महिला दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरो ग्य केंन्द्र कन्हान समोरील ग्रीन जीम परिसरात करण्या त आले असुन मान्यवरांचा हस्ते सावित्रीबाई फुले,राज […]

You May Like

Archives

Categories

Meta