वंचित बहुजन आघाडी व्दारे भारतीय विध्यार्थी दिवस थाटात साजरा

वंचित बहुजन आघाडी व्दारे भारतीय विध्यार्थी दिवस थाटात साजरा

कन्हान : –  गहुहिवरा चौक कन्हान येथे वंचित बहुजन आघाडी शाखा कन्हान व्दारे भारतीय विध्यार्थी दिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. 

       रविवार (दि.७) नोव्हेंबर २०२१ ला वंचित बहुजन आघाडी व्दारे गहुहिवरा चौक कन्हान येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करून वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम यांनी विशेष मार्गदर्शनात महामानव भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विध्यार्थी जीवनातील संघर्षा वर प्रकाश टाकुन (दि.७) नोव्हेंबर दिवस हा त्यावेळी वंचित, पिडित, शोषितांकरिता उदयास आलेल्या प्रकाशमय दिवसामुळं वंचित समाजाला आज शिक्षण, सामाजिक न्याय, बंधुता, समता, मौलिक हक्क, अधिकार, देशाला संविधान पर्यंतचा प्रवास याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या प्रसंगी प्रामुख्याने रामटेक विधानसभा उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले साहेब यांच्या प्रमुख उपस्थित संकल्प करण्यात आला की सामाजिक शैक्षणिक न्यायाकरिता वंचित बहुजन आघाडी विध्यार्थी मित्रा सोबत नेहमी खंभीर उभे राहुन कार्य करणार. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आभार महासचिव कन्हान शहर प्रवक्ता रजनीश (बाळा) वामन मेश्राम यांनी व्यकत केले. यशस्विते करिता कन्हान शहर उपाध्यक्ष शैलेश भाऊ ढोके, विकास साहारे, अमोल साहारे, मंगेश रंगारी, अरूण टेभुर्णिकर, जतीन गजभिये, भोला राणे, सतीश ढबाले सह कार्यकर्त्यानी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

पिपरी हनुमान मंदिरात दिवाळी पहाट भक्तीसंध्या व स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

Tue Nov 9 , 2021
पिपरी हनुमान मंदिरात दिवाळी पहाट भक्तीसंध्या व स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न कन्हान :- तालुक्यातील पिंपरी-कन्हान येथील श्री हनुमानजी मंदिर येथे दिपावली भाऊबिज च्या पावन पर्वावर दिवाळी पहाट भक्तीसंध्या व स्नेहमिलन कार्यक्रम थाटात संपन्न झाला.         रविवार (दि.७) नोव्हेंबर ला सांयकाळी ६ वाजता पिपरी-कन्हान येथील श्री हनुमान मंदीरात श्री शारदा तालनिकेतन विद्यालय व संगीत मित्र […]

You May Like

Archives

Categories

Meta