११४ आदिवासी गोवारी शहिदांना दिली श्रद्धांजली

आदिवासी गोवारी समाज संघटन कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान,ता.२३ नोव्हेंबर
आदिवासी गोवारी समाज संघटन कन्हान शहर द्वारे गोवारी शहिद स्मृति दिनी ११४ गोवारी शहिदांना श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड, गहुहिवरा चौक गोवारी शहिद स्मारका जवळ करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप भोडे ,प्रमुख अतिथि भगवान भोंडे, प्रकाश सहारे यांच्या हस्ते शहिद करुणाताई नेवारे व शहिद ताराचंद भोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
यावेळी नप नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर , उपाध्यक्ष योगेंद्र यादव, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, माजी नप उपाध्यक्ष डॉ.मनोहर पाठक, यांनी वर्ष २३ नोव्हेंबर १९९४ रोजी झालेल्या घटने बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहिद स्मारक पिपरिया (सिल्लारी) येथुन ११४ शहिद आदिवासी गोवारी बांधवांच्या स्मृति प्रित्यर्थ निघालेली श्रद्धांजलि यात्रा तारसा रोड, गहुहिवरा चौक गोवारी शहिद स्मारक कन्हान येथे पोहचली. नागरिकांनी फुलाच्या वर्षाने जोरदार स्वागत केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व आदिवासी समाज बांधवांनी नागरिकांनी महिलांनी शहिद करुणाताई नेवारे व शहिद ताराचंद भोंडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन ११४ आदिवासी गोवारी शहिदांना श्रद्धांजलि अर्पित करुन कार्यक्रम संपन्न करण्यात आला. प्रसंगी नगरसेविका संगीता खोब्रागडे, अनिता पाटील, सुषमा चोपकर, गुंफा तिडके, मोनिका पौनिकर, रेखा टोहणे, नगरसेवक विनय यादव, रामभाऊ दिवटे, राजेश जयस्वाल, वर्धराज पिल्ले, भरत पगारे, कामेश्वर शर्मा, महेंद्र चव्हान, रिंकेश चवरे, शैलेश शेळकी, लिलाधर बर्वे संजय रंगारी, ऋषभ बावनकर, प्रणय बावनकुळे, भरत सावळे, प्रभाकर रुंघे, सुरज वरखडे, हर्षल नेवारे, शुभम नागमोते, गणेश भालेकर, अजय लोंढे, समीता वांढरे, सुशिला सोनावने, लीलाबाई चौधरी सुगंधाबाई भोंडे, गीताबाई कोहळे, उषा सोनावने सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता माजी नगरसेवक अनिल ठाकरे, नेवालाल सहारे आनंद सहारे, विनोद कोहळे, रामाजी वाघाडे , श्याम शेंद्रे, क्रिष्णाजी सहारे, अरविंद नेवारे, वासुदेव कुसराम, नारायणजी सोनावने सह आदि ने सहकार्य केले .
Post Views: 190