वेकोलि खुली कोळसा खदान चा १० टन कोळसा चोरून नेताना ट्रक पकडला

वेकोलि खुली कोळसा खदान चा १० टन कोळसा चोरून नेताना ट्रक पकडला

#) कन्हान पोस्टे ला दोन्ही पसार आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ६ किमी अंतरावर पश्चिम भागास असलेल्या कामठी कोळसा खुली खदान डेपो मधुन दोन आरोपीने १० टन कोळसा चोरून ट्रक मध्ये भरतांना वेकोलि सुरक्षा कर्मचारी यांनी पेट्रोलिंग दरम्यान पकडुन कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार केल्याने कन्हान पोलीसानी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.२३) नोव्हेंबर २०२१ ला सायंकाळी ४ ते १२ वाजता दरम्यान आरो पी १) शैलेश कडबे २) ट्रक चालक राह. खदान कन्हान यांनी वेकोलि कामठी खुली कोळसा खदान च्या कोळसा डेपो मधुन १० टन कोळसा किंमत अंदाजे ५०,००० रूपयाचा मुद्देमाल चोरून वेकोलि परिसरात
एका ठिकाणी जमा करून ट्रक मध्ये भरतांनी वेकोलि सुरक्षा कर्मचा-यांनी पेट्रोलिंग दरम्यान दिसल्याने दोन्ही आरोपी ट्रक चा माल सोडुन पळुन गेल्याने कोळसा व ट्रक ताब्यात घेत पोस्टे कन्हान ला आनुन फिर्यादी वेकोली सुरक्षा कर्मी संतोष ईंद्रासन यादव वय ३७ वर्ष राह. कामठी काॅलरी कन्हान यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध अप क्र. ४२८/२०२१ कलम ३७९ , ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख हे पुढील तपास करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान ला ११४ आदिवासी गोवारी शहिदांना श्रद्धांजली अर्पण

Fri Nov 26 , 2021
कन्हान ला ११४ आदिवासी गोवारी शहिदांना श्रद्धांजली अर्पण #) आदीवासी गोवारी समाज संघटन कन्हान व्दारे श्रध्दाजंली कार्यक्रमाचे आयोजन कन्हान : – आदीवासी गोवारी समाज संघटन कन्हान द्वारे गोवारी शहिद चौक तारसा रोड कन्हान येथे मान्य वरांचा उपस्थित समाजाच्या न्यायीक मागणी करिता नागपुर हिवाळी अधिवेशनात चेंगराचेगरीत शहिद झालेल्या ११४ आदिवासी गोवारी […]

You May Like

Archives

Categories

Meta