
खापा तिघई पांधन रस्त्यावरील घटना
सावनेर : एका शेतातून दुसऱ्या शेतात जातांना विद्यूत तार पडुन युवकाचा मुत्य झाल्याची दुर्दैवी घटना खापा शिवारात आज सकाळच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार मुतक युवराज किरणाके वय 40 ह.मु.खापा हा खापा शिवारातील खापा तिघई पांधन रस्त्यावर असलेल्या योगेश हिंगे यांच्या शेतात मागील 8 – 10 वर्षांपासून सालदारीने काम करत असुन आपल्या शेतीतील काम आटपून पांधन रस्त्याने दुसर्याच्या शेतात तेथील मित्राला भेटान्यास जात असतांनाच पांधन रस्त्यावर असलेला विद्यूत तार त्याच्या अंगावर पडला व कुणालाही काही कळण्या आधिच तो जागीच गतप्राण झाला.आजुबाजुला शेतात काम करणाऱ्याच्या लक्षात सदर बाब येताच त्यांनी लगेच घटनेची सुचना दिल्याने म.रा.वि.म. व्दारे सदर विद्युत प्रवाह बंद करुन सदर घटनेची सुचना खापा पो.स्टे.ला दिली.
ठाणेदार हर्षल ऐकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मु्तक युवराज चे पार्थिव उत्तरीय तपासणी करीता प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे रवाना करुण खापा.पो.स्टे.येथे आकस्मिक मु्त्यू ची नोंद करुण हेका.अशोक निस्ताने व सिपाई अंकुश लाखे पुढील तपास करितआहे.
मुतक युवराज हा मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यातील सोसुरडोह येथील मुळचा रहवासी असुन रोजगारा करिता मागील आठ दहा वर्षापासून तो खापा येथे राहत असुन त्यास पत्नी व दोन लहान मुले असल्याची माहीती आहे.