महिला अत्याचार विरोधात आक्रोश आंदोलन पाराशिवनी तालुका भारतीय जनता पार्टी चे निदर्शने

*महिला अत्याचार विरोधात आक्रोश आंदोलन पाराशिवनी तालुका भारतीय जनता पार्टी चे निदर्शने*

कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

 

पारशिवनी (ता प्र):-सोमवार दि 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टी पारशिवनी तालुका व भाजपा महिला मोर्चा पाराशेवनी तालुका च्या वतीने महाविकास आघाडी सरकार चा निषेध करून आक्रोश आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार चे कार्यकाळात राज्यातील विविध भागात बालीके पासून महिला माता- भगीनी वर होत असलेल्या अन्याय ,अत्याचार विरोधात निदर्शने करण्यात आली.कोवीड रूग्णालयात सुध्दा महिला अत्याचाराच्या शिकार होत असून महिलांचे जिवन असुरक्षित आहे.
निर्णयशून्य , निष्क्रिय, निष्प्रभ, निष्ठूर महाविकास आघाडीचे मा.मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे यांचा प्रशासन व सरकार वर वचक नसल्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांन मधे सातत्याने वाढ झाली आहे. भारतीय जनता पार्टी च्या वतीने राज्यव्यापी आक्रोश आंदोलन करून ठाकरे सरकार ला जाब विचारण्यात आला.महिला माता भगीनी ची सुरक्षा करता येत नसेल तर खुर्ची खाली करा अशी मागणी करण्यात आली.

पाराशिवनी तहसिल कार्यालया समोर निदर्शने करण्यात येऊन मा.तहसिलदार अधिकारी यांना निवेदन देवून महिला अत्याचार बाबत तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या.

सरकारला जागेवर आणण्यासाठी पारशिवनी येथे तहसील कार्यालय येथे महिलांच्या उपस्थितीत हातात काळे फलक घेऊन विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले तसेच राज्यांच्या राज्याचे मुख्यमंत्र्यांना पारशिवनी येथील तहसीलदार माननीय वरून सायरे यांना आणि पारशिवनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांच्यामार्फत शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले त्या आंदोलनाला नागपुर जिला भाजपा महिला आघाडी माजी महामंत्री रेखाताई दूने दार यांच्या नेतृत्वात मोर्चाला उपस्थित माननीय छायाताई येरखेडे . (तालुकाध्यक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा )सरिता ताई लसूते तसेच अनिताताई भड.(नगर पंचायत पाराशिवनी,नगरसेविका) माधुरीताई बावनकुडे(भा ज पा शहराध्यक्ष )व कविताताई पनवेलकर (भा ज पा महामंत्री) तसेच रूपालीताई फाले. सुषमाताई चोपकर(कन्हान नगर पारिषद ,नगर सेविका), स्वातीताई पाठक(अहिल्या होल्कर महिला पतसंस्था) शालिनीताई बर्वे, हर्षाली ताई नागपूरकर, अरुणाताई हजारे(ग्रा पं सदस्या,काद्री), वंदनाताई कुरडकर(नगरसेविका नः प कन्हान), वर्षा लोंढे,(नगरसेविका नः प कन्हान),लक्ष्मीताई लाडेकर, (माजी नगरसेविका नः प कन्हान),रेखाताई परते, (माजी नगरसेविका नः प कन्हान),कमल फुलबांधे पारशिवनी, लता सायरे पारशिवनी आणि मोठ्या संख्येने तालुक्यातिल् भाजपा महिला पदाधिकारी व महिला भगिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तालुकात १३९४रूग्ण तुन १२४२रूग्ण घरी परतले,१२२स्ग्ण उपचार घेत आहे ,२९ रूग्णाची मृत्यु झाली

Tue Oct 13 , 2020
तालुकात १३९४रूग्ण तुन १२४२रूग्ण घरी परतले,१२२स्ग्ण उपचार घेत आहे ,२९ रूग्णाची मृत्यु झाली,नियमाचे नियमित पालन करा , वैद्यकिय अधिकारी यांची माहीती कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी (ता प्र):-पाराशेवनी तालुकातील पाच ही प्राथमिक आरोग्य केन्दातुन आज पर्यत एकुण १३९४रूग्ण ची भर * पाराशिवनी ग्रामिण रुग्णालय तुन १६४, दहेगाव (जोशी)प्रा आ […]

You May Like

Archives

Categories

Meta