निमखेडा (तेलनखेडी) येथे विकास कामाचे भुमिपुजन

निमखेडा (तेलनखेडी) येथे विकास कामाचे भुमिपुजन

कन्हान : – पं स पारशिवनी, गोंडेगाव जि प क्षेत्र अंतर्गत ग्राम पंचायत निमखेडा (तेलनखेडी) येथे जल जिवन योजने अंतर्गत १२ लाख व स्वच्छ भारत अभियान ३ लाख निधी विकास कामाचे भुमिपुजन करण्यात आले.
पंचायत समिती पारशिवनी, जिल्हा परिषद गोंडेगाव सर्कल अंतर्गत ग्राम पंचायत निमखेडा येथे जल जीवन मिशन अंतर्गत मौजा निमखेडा येथे टाकी दुरुस्ती, स्विच रूम बांधकाम १२ लाख रुपये व स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत सार्वजनिक शौचालय तीन लाख रुपये असे एकुण १५ लाख रुपयाच्या बांध कामाचे भुमिपुजन सभापती श्रीमती मीनाताई कावळे यांचे शुभहस्ते व विरोधी पक्ष उपगट नेता, गोंडेगाव जि प सदस्य व्यकटेश कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

याप्रसंगी बनपुरी पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम, निमखेड़ा सरपंचा सौ.कलावती शुभाष तडस, उपसरपंच श्री देवाजी डोंगरे, ग्रा.प. सदस्य श्री भाऊराव हिंगे, सौ.वंदना कुंभलकर, सौ.काचन वाड़ीभस्मे, सचिव श्री राजकुमार बागड़े, रामभाऊ मल्लेवार, रामदास अवजे, कोषाध्यक्ष भा.ज.पा. अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा श्री धर्मेन्द्र गणविर सह गावातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बिबटयाच्या हल्ल्यात एसंबा येथील जर्शी कारवड ठार तर बखारी ची जर्शी कारवड गंभीर जख्मी

Sun Jan 16 , 2022
बिबटयाच्या हल्ल्यात एसंबा येथील जर्शी कारवड ठार तर बखारी ची जर्शी कारवड गंभीर जख्मी #) बिबटयाचा धुमाकुळ, पाच घटनेत ७ प्राळीव जनावरांची शिकार करून ठार तर २ जख्मी केले. कन्हान : – पारशिवनी तालुकातील एंसबा गाव शिवा रात शनिवार पहाटे सकाळी बिबटयाने हल्ल्या करून शेषराव ठाकरे ची गोठयात बाधलेली जर्शी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta