व्यक्तीमत्व फुलवण्यासाठी कठोर मेहनत घ्या-मिलिंद वानखेडे
धर्मराज प्राथमिक शाळेत विद्यार्थी उत्सव स्नेह संमेलन

कन्हान,ता.२७ जानेवारी
बालवयातच व्यक्तीमत्वाचे अंकुर फुलते. त्यामुळे आपल्या मुलांचे चांगले व्यक्तीमत्व घडविण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी सुध्दा कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहन विद्यार्थी उत्सवाचे उद्घाटक शिक्षक नेते श्री.मिलिंद वानखेडे यांनी केले.

धर्मराज प्राथमिक शाळेत विद्यार्थी उत्सव स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणुन शिक्षक नेते श्री.मिलिंद वानखेडे तर अध्यक्षस्थानी धर्मराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रमेश साखरकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणुन मुख्याध्यापक श्री.खिमेश बढिये, पालक प्रतिनिधी श्री. विधिलाल डहारे, परिवहन समिती अध्यक्ष श्री.गज्जु बल्लारे, पर्यवेक्षक श्री.सुरेंद्र मेश्राम, पालक प्रतिनिधी सौ.सोनुताई पोटभरे, माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.दिनेश ढगे उपस्थित होते.

धर्मराज प्राथमिक शाळेचा गौरवशाली इतिहास असुन रौप्य वर्षात पदार्पण केले आहे. कन्हान परिसरात गुणवत्तापुर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणुन धर्मराजचा नावलौकिक असुन चांगला नागरिक घडवित असल्याचे प्रतिपादन उद्घाटक श्री.मिलिंद वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.खिमेश बढिये यांनी करून शाळेचा गौरवशाली इतिहास विशद केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर आभार श्री.अमित मेंघरे यांनी व्यकत केले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनास श्री. भिमराव शिंदेमेश्राम, श्री.राजु भस्मे, श्री.अमित मेंघरे, श्री.किशोर जिभकाटे, सौ.चित्रलेखा धानफोले, कु.शारदा समरीत, कु.हर्षकला चौधरी, कु.अर्पणा बावनकुळे, कु.प्रिती सुरजबंसी, कु.पूजा धांडे, कु. कांचन बावनकुळे, सौ.वैशाली कोहळे, श्री.सतीश राऊत, श्री.नरेंद्र कडवे, श्री.हरिष केवटे, श्री.महादेव मुंजेवार, सौ.सुनीता मनगटे, सौ. सुलोचना झाडे, सौनंदा मुद्देवार, सौ.संगीता बर्वे यांनी व पालक वृदांनी सहकार्य केले.
Post Views: 186
Sat Jan 28 , 2023
प्राथमिक आरोग्य केंद्रात शहर विकास मंच द्वारे ध्वजारोहण कन्हान,ता.२७ जानेवारी कन्हान शहर विकास मंच द्वारे ७४ व्या प्रजासत्ताक प्राथमिक आरोग्य केंन्द्र परिसरात ध्वजारोहण आणि आदर्श हायस्कुल ला नेताजी सुभाष चंद्रबोस यांची प्रतिमा भेट देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवार (दि.२६) जानेवारी ७४ वा प्रजासत्ताक दिवस […]