कन्हान नदीत कोळसा खदानचे दुषित पाणी सोडण्या वर प्रतिबंध लावा  :    ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे गोंडेगाव उपक्षेत्र खुली कोळसा खदान उपक्षेत्र प्रबंधकास निवेदन  

कन्हान नदीत कोळसा खदानचे दुषित पाणी सोडण्या वर प्रतिबंध लावा.                                 

#) ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे गोंडेगाव उपक्षेत्र खुली कोळसा खदान उपक्षेत्र प्रबंधकास निवेदन.  

कन्हान : –  ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चे अध्यक्ष व माजी खासदार मा प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वात गोंडेगाव उपक्षेत्र प्रबंधक तरूणकुमार त्रिपाठी हयाना शिष्ठमंडळा व्दारे गोंडेगाव- घाटरोहणा खुली कोळसा खदानचे दुषित पाणी कन्हान नदीत सरळ बिनधास्त सोडण्यावर प्रतिबंध लावा. अन्यथा जल जन आंदोलनास सामोरे यावे.  अशा इशारा सुध्दा देण्यात आला.  

        वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्र अंतर्गत गोंडेगाव – घाट रोहना खुली कोळसा खदान मध्ये कोळसा उत्खनन करून दररोज २४ तास दुषित पाणी बाहेर फेकण्यात येते हे कोळसा व रासानिक स्पोटक मिश्रीत दुषित पाणी मोठमोठया पंम्प व्दारे खुल्या खाणीतुन ओढुन ६ नंबर रेती घाट, गाडेघाट, जुनिकामठी-घाटरोहणा घाटाच्या नाल्यातुन सरळ नदीत तसेच गोंडेगाव वसा हत, गोंडेगाव, घाटरोहना गावातील लोकवस्तीचे सांड पाणी सह दुषित पाणी कन्हान नदीत बिनधास्त पणे सोडत असल्याने कन्हान नदी मोठया प्रमाणात प्रदुषि त होत आहे. याच नदीतुन नागपुर महानगर पालिका, कामठी शहर, जुनिकामठी, गाडेघाट, कन्हान -पिपरी, कांद्री व परिसरातील गावाच्या नागरिकांना ब्लीचींग टाकुन पिण्याकरिता नदीचे हेच पाणी पुरवठा करित असल्याने नागरिक विविध रोगाच्या आजाराने त्रस्त  आहे. गोंडेगाव-घाटरोहना खुली खदानचे कन्हान नदी ६ नंबर घाट, गाडेघाट, जुनिकामठी-घाटरोहणा घाटा च्या नाल्याने सोडत असल्याने यावर प्रतिबंधात्मक एसटीपी लावुन हे पाणी शुध्द करूनच नदीत सोडण्या त यावे जेणे करून कन्हान नदीला प्रदुषित होण्यापासु न आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास होणा-या आजाराच्या धोक्यापासुन वाचविता येईल.  

       नागपुर जिल्हयाची एकमेव जिवनदाहीनी कन्हान नदीचे अस्थित्वत कोळसा खाणीच्या दुषित पाण्याने व नागरी घाण, सांडपाण्याने प्रदुषित होऊन धोक्याची घटका मोजत आहे. कोळसा उत्खनन जसे राष्ट्राकरि ता महत्वाचे आहे तसेच कन्हान नदी पिण्याच्या पाण्या चे नैसर्गिक प्रमुख स्त्रोत, साधन असल्याने नदी परिस रातील नागरीका़चे जिवन सुखकर व समृध्द करण्याक रिता ही नदी प्रदुर्षण मुक्त करणे काळाची गरज आहे. यास्तव वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्र अंतर्गत गोंडेगाव-घाट रोहना खुली कोळसा खदान व्दारे कन्हान नदी मुखा जवळुन १ किमी दुर अंतरावर दुषित पाण्याच्या नाल्या वर प्रतिबंधात्मक एसटीपी लावुन पाणी स्वच्छ करून च नदीत पात्रात सोडण्यात यावे.अन्यथा आपणास जल जन आंदोलनास सामोरे यावे लागेल. आंदोलनात उदभवणा-या सर्व परिस्थितीस आपण सर्वश्री जवाब दार राहाल. 

         ” जल हेच जिवन आहे ” कन्हान नदीचे अंनंत उपकार आम्हावर आहेत. नदीत दुषित पाणी सोडण्या वर प्रतिबंध लावुन नदी प्रदुर्षण मुक्त करा.अन्यथा अशु ध्द पाण्या विरूध्द हे एक युध्दच ! अशा इशारा प्रशास नाला देण्यात आला. याप्रसंगी शिष्टळात ग्रामोन्नती प्रतिष्ठान अध्यक्ष, माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव , मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, गोविंद जुनघरे ,   गणेश भोंगाडे, महेश काकडे, प्रमोद निमजे, भुषण इंगोले, कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, सुतेश मारबते, नरेश बर्वे, सिन्नु विनेवार, धनंजयसिंह, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष डोकरीमारे, आकाश पंडीतकर, योगेंद्र रंगारी, सतिश भसारकर, मनिष भिवगडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.   

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

भाजपचे शंकरराव चंहादे ६ वर्षाकरिता निलंबित तर दोघांना कारण दाखवा नोटीस

Wed Mar 3 , 2021
भाजपचे शंकरराव चंहादे ६ वर्षाकरिता निलंबित तर दोघांना कारण दाखवा नोटीस #) पक्षाच्या अधिकृत भुमिकेशी विसंगत वर्तणुकीने चंहादे निलंबित, हजारे, शेंदरे यांना नोटीस.   कन्हान : –  नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला समर्थन दिल्यामुळे भाजपा पदाधिकारी चांगलेच अडचणीत आले असुन माजी नगराध्यक्ष व वर्तमान स्वीकृत सदस्य  शंकरराव चहांदे […]

You May Like

Archives

Categories

Meta