मा.कै.वसंतरावजी नाईक साहेब यांची १०७ व्या जयंती साजरी

घाटंजी : दिनांक १/७/२०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,हरित क्रांतीचे प्रणेते मा.कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांची १०७ व्या जयंती निमित्य घाटंजी येथे बंजारा समाज बांधव व राष्ट्रीय बंजारा टायगर्स तर्फे नाईक साहेबांची जयंती व वृक्षरोपनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.


यावेळी तांड्याचे नायक नामदेवरावजी आडे व कारभारी अरविंदभाऊ जाधव यांच्या हस्ते प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले,ब्रम्हानंदजी चव्हाण,पी. ऐस. राठोड,यांच्या हस्ते पुजन करण्यात आले त्यानंतर माँ जगदंबा व संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात तांड्याचे डाव बंडू जाधव व मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष कैलाशभाऊ राठोड, बाबूसिंग राठोड यांचे हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले यावेळी राजू राठोड, गोवर्धन आडे, अशोकभाऊ चटूले,संजय आडे, सुनील राठोड, छोटू राठोड शेरु देवतळे आदी मंडळी उपस्थित होते कोरोनाचे संकट असल्यामुळे गर्दी न करता सोशल डिस्टनसिंग पाळून संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर पब्लिक स्कुल बाबत अफवा पसरवनाऱ्यांवर होणार कारवाई

Sun Jul 5 , 2020
सावनेर पब्लिक स्कुल बाबत अफवा पसरवनाऱ्यांवर होणार कारवाई.. *सावनेर पब्लिक स्कुल कोरोटाईन सेंटर नसून कोविड -१९ सेंटर होते : गटविकास अधिकारी सावनेर:- सावनेर पब्लिक स्कुल सावनेर जिल्हा नागपूर ही अतिशय चांगले शिक्षण देणारी सावनेरातील शिक्षण संस्था आहे या शाळेत सर्व भौतिक सुविधा उपलब्ध असून परिसर मोकळा व प्रशस्त आहे, त्यामुळे […]

You May Like

Archives

Categories

Meta