कन्हान पोलीस स्टेशन द्वारे जागतिक महिला दिवस कार्यक्रम थाटात साजरा

*कन्हान पोलीस स्टेशन द्वारे जागतिक महिला दिवस कार्यक्रम थाटात साजरा*

 

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन द्वारे जागतिक महिला दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर परिसर गांधी चौक येथे करुन सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करीत सर्व महिलांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करुन जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला .


सोमवार दिनांक ०८ मार्च जागतिक महिला दिवस निमित्य कन्हान पोलीस स्टेशन द्वारे कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर परिसर गांधी चौक येथे करुन कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्हान पोलीस स्टेशन चे निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा हस्ते व कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांचा उपस्थिति मध्ये सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कन्हान पोलीस स्टेशन चे पीएसआई नंदा पाटील , नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , अॅड.जोशिला ऊके , यांनी मार्गदर्शन केले असुन सखी मंच अध्यक्ष नितु तिवारी , ममता दास यांनी सुंदर गीत प्रस्तुत केले .

कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले असुन कार्यक्रमाचे समापन अल्पोहार वितरित करुन जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला . याप्रसंगी मनीषा चिखले , लीना हारोडे , शुभांगी घोघले , इंद्रा कुर्मी , वैशाली बेलनकर , वैशाली थोरात , कुंदा मोटघरे , माया तितरमारे , उषा पोटभरे , प्रियंका सलामे , स्मिता पाटिल , मंगला पिल्ले , लता लुढेंरे , हर्षाली भनारकर , कन्हान पोलीस स्टेशन चे महिला पोलीस कर्मचारी सह मोठ्या संख्येत महिला उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व्दारे आजनी येथील गरजुंना धान्याचे वितरण 

Tue Mar 9 , 2021
तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व्दारे आजनी येथील गरजुंना धान्याचे वितरण  #) ” भुकेलेल्यास एक मुठ अन्न, धान्य आपल्या व्दारे ” सेवाभावी उपक्रमाची सुरूवात.   कन्हान : –  तेजस बहुउद्देशीय संस्था व प्रशिक्षण कामठी व्दारे गरजु गरिब, बेसहारा, वयोवृध्द, विधवा महिला अश्या लोकांवर उपासमारीची पाळी येऊ नये म्हणुन ” ़भुकेल्यास एक मुठ अन्य, […]

You May Like

Archives

Categories

Meta