तेजस संस्थेचे माणुकी व सेवेभावेतुन मौलिक कार्याचा परिचय

तेजस संस्थेने मृतक आदित्य शिंदेचे प्रभात दवाखान्याचे बिल केले माफ

#) तेजस संस्थेचे माणुकी व सेवेभावेतुन मौलिक कार्याचा परिचय. 

कन्हान :- सुपर टाऊन येथील राजु शिंदे च्या १८वर्षीय मुलाचा ब्लड कैंसर आजाराने मुत्यु झाला.त्यांची परिस्थिती अंत्यत नाजुक व दवाखान्याचे बिल भरण्यास असमर्थ असल्याने तेजस संस्थेचे चंद्रशेखर अरगुलेवार च्या सेवेभावेतुन डॉक्टरांनी ३० हजाराचे बिल माफ केले. तसेच शिंदे परिवारास तांदुळ, गहु व तेल भेट देऊन सेवाभावेतुन मौलिक कार्यचा परिचय दिला. 

     सुपर टाऊन कन्हान येथील आदित्य राजु शिंदे वय १८ वर्ष यांचे(दि.१२) सप्टेंबर ला ब्लड कैंसर आजाराच्या उपचारा दरम्यान प्रभात दवाखाना कामठी येथे दुःखद निधन झाले. परिवाराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असुन १८ वर्षाच्या मुलाचा ब्लड कैंसर आजाराने मुत्यु होऊ न अत्यंत दैना अवस्था झाल्याने मृतक मुलाचे खाजगी प्रभात दवाखान्याचे बिल भरण्यास परिवार असमर्थ असल्याचे ते जस बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार हयांना माहीत होताच ते प्रभात दवाखाना कामठी ला पोहचुन दवाखान्याचे डॉ रामटेके सर, सहायक डॉ जगदीश भिषेन, संचालक व मालक डॉ रुचि अग्रवाल यांना भेटुन मृतकांच्या परिवारांची अत्यंत नाजुक परिस्थिती असल्याचे त्यांच्या निर्दशनात आणुन देत दवाखान्याचे बील माफ करण्याची विनंती केल्याने डॉ रूचि अग्रवाल हयानी माणुष्कीचा नात्याने ३० हजार रू पयांचे बिल माफ केले. यास्तव डॉ रूचि अग्रवाल, डॉ रामटेके, डॉ जगदीश भिसे न यांचे तेजस संस्थेचे चंद्रशेखर अरगुले वार, वडील राजु शिंदे, काका नरेश शिंदे, सेवक शिंदे आदीने आभार व्यक्त केले. 

       या कोरोना संकट काळात कन्हान च्या राजु शिंदे यांचा १८ वर्षाचा मुलगा ब्लड कैंसर आजाने मुत्यु होऊन परिवारा वर दु:खाचा डोंगर कोसळल्याने तेजस संस्थेचे अघ्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यां नी सेवाभावनेतुन दवाखान्याचे ३० हजाराचे बिल माफ करण्यास मदत करून शिंदे परिवाराचे राहते घर सुपर टा़ऊन ये थे २५ किलो तांदुळ, गहु व ५ किलो तेल भेट देऊन मौलिक कार्य करित तेजस संस्था ही सदैव माणुकी व मानवतेचा कल्याणार्थ कार्य करणारी संस्था असल्याचा परिचय करून दिल्याने राजु शिंदे परिवाराने चंद्रशेखर अरगुलेवार आणि तेजस संस्थेच्या सर्व पदाधिका-याचे मनस्वी आभार व्यकत केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात नविन ६ रूग्ण 

Wed Sep 23 , 2020
कन्हान परिसरात नविन ६ रूग्ण  #) कन्हान ४, कांद्री २ असे ६ रूग्णा सह कन्हान परिसर ६७८.     कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२३) ला रॅपेट व स्वॅब ६१ लोकांच्या चाचणीत ५, कामठीतील १ असे ६ रूग्ण आढळुन कन्हान […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta